संपादकीय

            सब्बान कुपारी बाहा-बेनींना नाताळश्या हनायो आन नव्या वहरायो ओबड्यो शुभेच्छा. 

          मंडळी, आमशी ‘कुपारी कट्टा’ टिम कून भोटे माहने नात पन “कादोडी’ अंक यो आपल्या कुपारी समाजाआ मुखपत्र हाय आहा आमाला वाटातॅ भगून लान्या तॉंडा भॉटॉ मॉडकॉ घॅत्याव पन आपल्या समाजात जा का सल्लॅ त्योर बोयला पाय. आमॅ नेहमी एकुस विसार करत्याव की जहा बरा सल्लॅ त्याला आपून जहा तुकॉन धरत्याव ताहा जा चुकीआ सल्लॅ त्याओर पन बोयला पाय.

          मंडळी, आपल्या अडॅ कईक मयन्या अगोदर तरुन पॉराई जीव दिलॉ, तॅ कैक जनाई घारा न हांगता पळॉन लगीन केला. आज आपले पोरे शिक्षान, नोकरी आन देशात जा सल्लॅ त्याबनॅ टेन्शन मिनॅ हात, पन त्यास वॅळॅला त्याई ऑडा लक्षात ठव्या पाय की २०-२२ वहरे तुमश्या आयबापाई तुमाला तुमश्यो जकल्यो इच्छा पुऱ्यो करॉन वाडविला, चांगला शिक्षान दिला, चांगलॅ संस्कार दिलॅ तॅ तुमॅ अहे पटकान भाऑ (विहरॉ) नाका.

          तरुन मंडळींला आवाहन कर्‍यासा हाय गा, तुमॅ तुमशॅ प्रॉब्लेम तुमश्या ममी-पप्पाला हांगा, त्याहरी बॉला, मंग ता प्रेम अहो गा बी कय गोष्टी. मम्मी-डॅडी सुरूवातीला विरोद करद्यात पण ते तुमश्या भल्याऑस विसार करनार. तहेस तुमश्या मित्र-मैत्रिनीबरबर तुमॅ शेयरिंग करू शकात्या. कून तरी तुमाला चांगला हांगॅदॅस पान एकदम टॉकाआ पाऊल घॅऑ नाका. ताहास आय-बापाई पोरांना समजॉन घ्या पाय, माला वाटातॅ तास मा पॉरानॅ / पोरीनॅ कर्‍या पाय आहा बंदान नाका, आपून पन त्यांना समजॉन घ्या पाय.

          बी मंजॅ अह्यो घटना घडल्यो गा आपल्या मिनसॉ डिटेक्टिव्ह नातॅ पत्रकार जागॉ हॉवातॅ. मंग बर्‍यापैकी त्या प्रकरनोर काथ्याकूट कॅला जातॅ. एकाये दोन करॉन कितीतरी प्रकारश्यो अफवा पसरविल्यो जात्यात. त्या घरश्या लोकाई का परिस्थिती जाले हायदॅ त्याआ आपल्याला भान नाहातॅ. अह्या वॅळॅला मदत कऱ्याशी तॅ हॉडॉन द्या पण त्याआ घारा जाऑन नाय ती बडबाड कदो कर्‍याशी.

          मंडळी, अजून एक बात हाय, आमॅ गॅल्या वहरा पन हांगिलता आन यंदा परत हांगात्याव, आपुन लग्नाआ कार्यक्रमाओर ध्यान द्या पाय आहा आमाला वाटातॅ, गुरवारपासून लागला तॅ पुडश्या आठवड्याआ मंगळवारपोत आपलॉ कार्यक्रम सुरू आहातॅ. नक्की ऑड्या सेलिब्रेशनशी

गरज हाय गा. या कार्यक्रमात हॉनारी सयपाकाइ नासाडी, प्री-वेडिंग रिसप्शनमुळॅ सुकनारॉ अंदाज, त्यामुळॅ हॉनारॉ पैशाऑ नास. यावर आपुन जरा कडाक नंदार टाक्या पाय.

          मंडळी, आतॅ आनंदायो बातम्यो. भुईगाव, सामनी आळीशी कॅरोल लिनस डाबरे यीला १२८ देशाश्या १७६० सॉफ्टवेअर इंजिनियर मीननॅ इंटरनॅशनल इंजिनियरिंग लिडरसॉ मान मिळॉन गोल्ड मेडल मिळालॅ, आपल्या समाजाऑ यॉ अभिमान हाय. तिआ अभिनंदन. शिरलयवाडीसॉ पॉर, इयान लोपीस यानॅ गेल्या मयन्यात झांबिया इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेमिनॅ डबल्सशी स्पर्धा जिकिली आन या मयन्यात खेलो इंडिया स्पर्धेमिनॅ सिल्वर मेडल जिकिला, त्याआ अभिनंदन.

          आपले पोरे अभ्यासा बरबर कला-क्रीडा या प्रकारात पन बर्‍यापैकी चमक्या लागल्यात त्यांना पुडॅ जादो खुब खुब शुभेच्छा. त्यासबरबर आपल्या समाजासॉ नावाजलॅलॉ कवी-लेखक सायमन मार्टिन यांना जानेवारी मयन्यात नाशिकला हॉनार्‍या २७व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाआ अध्यक्षपद मिळालॅ, त्यांसा अभिनंदन आन संमेलनाकरता शुभेच्छा.

          मंडळी, आपलॉ ‘कादोडी’ अंक छापील आन ऑनलाइन अहॉ दोन्ही प्रकारॅ प्रकाशित हॉतॅ, छापील प्रती ज्यांना पात त्याई आमश्या संपादक मंडळाला कॉन्टॅक्ट करा. आमॅ पॉशव्याशी व्यवस्था करत्याव.

           कादोडी अंकातनॅ आपली भाशा जगवॅकरता प्रयत्न करतॅवुस पन दरवहरा आपल्या समाजाआ भल्याकरता एक बरॉ विसार पन देत्याव. एक कुपारी समाज भगून आपुन जकले सोबत रॅवॉन पुडॅ जाऑ. बाकी आपल्या समाजायी अहीस चांगली प्रगती हॉत रेवो आन आपली संस्कृती टिकॉन रेवो…