गाव – घराला घरपान
घराऑ कारभारी शाळीत गॅलॉ नॉतॉ, तरी तॉ दिलदार हॉतॉ
अडीअडसनीला धाऑन, जकल्या उपेगी पडातोतॉ
अॅकमॅकां घारा जात येत हॉतॉ
सुकदुखात नवटाक पावशेर मारतोतॉ
दी माळता सब्बान गावकरी अॅका जागी भॅटॅशॅ
तिगाळा गावाला गावपन हॉता.
कौला घराला कारवी कुडायो भिती
नोत्यो खोल्यो पन घर पॉरांबाळाय भरलॅला
आंगाळ ऑटॉ भॉठॉ, त्योर कूटूमाई बैठक
दिहा भरायो वार्ता होतोत्यो, घराला घरपन हॉता
गॉठॅत गाई भई होत्यो
गाई हारक्यो मायाळू माय होत्यो
ऑबाय तीआ पुडॅ बकरी, नवरॉ तिगाळा बैल नॉतॉ
वडीलधार्यांना मान, तॅँआ सब्दाला किमत होती
शारानॅ – आठानॅव व्यवार हॉतॉ
संवसार सलातोतॉ, काडीमोडसा नाव पन नॉता
गावकरी हाकाभोटे लवकर उठात
शा बटर-पाव खाऑन, ऊबी रॅआ भाटात
ओनव्याय पाळ दांडपाळ करीत, तांब्यामिनशी कनेरी पेत
बांदॅसूद आंग, पॉटाइ ढेरी नोती
तिगाळा योग, जिम तॅला माइत नोती
दॉपारसा जिव्या रात्या धान वर बुंबला कालवान
मुंडयात सॉ आंबॉ नातॅ भुजलॅलॉ पापड तॉँडा
रांबलॅल्या कोलूमा बरबर पांडो कांदॉ
पन आदी नवटाक-पावशेराऑ डोस
भुयोर बॅहॉन केळीआ खोल्योर पॉटभर जिवीत
भर दॉपारात भाटात जाऑन आयमेरीला घारा येत
आल्तारा रजार कुटुंमात करेशे
यात ते गुतले भगून ते मस्त रेले
चायनीज तंदुरी सब्द माइत नॉतॉ
धापटी पाल्गॉ ऑस मेन मेन्यू हॉतॉ
पालग्यानॅ घसॉ ऑरपॉन कफ नीगॉन जासॉ
धापटीआ दड्ड्याला शा ढकलॅसॉ
पॉट भरोन पडल्या जागी नीजॅसॉ
तिगाळा लोक निरोगी होते, नीजॅइ गोळी घेत नोते.
हाकोटश्या टॉलॅला ऊठॉन देवळायो पायर्यो सडात
पास सा पयला मिस्सा आयकॉन कामाला सुरवात करीत
तिगाळा गावाला गावपान आन घराला घरपन हॉता
आतॅ पावले जरी लाम गेले तरी
जुन्यो आठोनी मनात रेल्यो हात ना
त्या काळात गावात एक माय होती
आन लॅकराइ मायेला उबदार साथ होती
आतॅ आय नाका आनु उबदार माय नाका
डॅड मॉम आन एक बेबी बाबू
त्रिकोन चौकोन पुर्न विराम
— आलेस डाबरे, निर्मळ