संपादकीय

सब्बान कुपारी बाहा-बेनींना नाताळश्या  हनायो आन नव्या वहारायो ओबड्यो शुभेच्छा. 

मंडळी,  एप्रिल २०१२ ला ईस्टरश्या दिहा आपलॉ अयलॉ-पयलॉ ‘कादोडी’ अंक प्रकाशित जालतॉ. यंदा बारावा वहरी सुरु जालॅ, मिनॅस आमाला वाटला की लेख-कविता कय आला नाय तॅ अंक काड्यासॉ बंद कर्‍या लागॅदॅ गा का? पान नाय… २०१२ पासून आपल्या समाजात या अंकामुळॅ एक जही नवीन क्रांती घडली, कारन यॉ अंक प्रकाशित झाल्योर त्या वहरापासुन “बारा आने बाटली जाम काम” या आपल्या बोलीभाषेतश्या आजवरश्या पयल्या नाटकाव ३५ वहरानंतर परत एकदा प्रयोग झालॉ. “कुपारी संस्कृती मंडळ” स्थापन झाला, त्याद्वारे ओडे वहरे जाले, “कुपारी महोत्सव” साजरॉ हॉतॅ. “हाऊ ओऊसा तळा” या नवीन नाटका खेळाला सुरुवात जाली. आपल्या पोरांबरबर मराठी बोलनारॅ लोक त्याहरी आपल्या भाशॅत बॉल्या लागलॅ. आपली तरुन पिढी जी आपलॉ पारंपारिक पोशाख जवळजवळ बाहालतॅ (विहारलोतॅ) ते वॅगवॅगळ्या कार्यक्रमानिमितान घाल्या लागले. आपल्या भाशॅत पुस्तके प्रकाशित जाले.

आन त्यावर कळस मंजॅ आपल्या भाशेश्या लिखानावर डॉ. नेहा सावंत याई अब्यास कॅलॉ आन त्यांश्या परबंदाला यंदा पीएचडी मिळाली, यी आपल्या समाजाकरता खुब भोठी गोष्ट हाय, त्यांना विनंती केलती की तुमॅ तुमसॉ यॉ सब्बान परवास आपल्या अंकाकरता लिऑन द्या, मराठीमिने द्या आन आमॅ आपल्या भाशेत कर्त्याव. त्याई मस्तपैकी आपल्या ‘कादोडी’मिनॅ लीवॉन दिलॉ, आमाला जास्ती मेहनत कर्‍या लागली नाय. तुमॅ तॉ वासास. नेहाबायसा खुब खुब अभिनंदन.

मंडळी, कायिक गोष्टीओर आपुन ध्यान द्या पाय आहा आमाला वाटातॅ, आपले पोरे खुब बर्‍यापैकी बार जा लागल्यात, आपलॅ पाऊनकोटी, कोटीये बंगले ओस पड्या लागल्यात, कायिक घरात फक्त वयस्कर माहनॅ हात… आपल्या अडश्या लगनामिनॅ हॉनारी सयपाकाइ नासाडी, प्री-वेडिंग रिसप्शनमुळॅ चुकनारॉ अंदाज, त्यामुळॅ हॉनारॉ पैशाऑ नास. सामाजिक कामाकरता नातॅ कुहना आंदोलन कर्‍या करता आपला आतॅ मागॅ पडनारा पाऊल, आन त्यामुळॅ आपल्या समाजातनॅ समाजाला पुडॅ घॅवॉन जायदॅ आहा राजकीय नेतृत्व न हॉना.. या गोष्टीओर आपुन जरा कडाक नंदार टाक्या पाय. बाकी आपलॉ कुपारी समाज कुहन्यास गोष्टीत मागॅ नाय, आपल्या समाजानॅ खुब प्रगती केले, कला-क्रीडा आन अहयास अनेक क्षेत्रामिनॅ खुब ऊंची गाठीले, खाजगी कंपन्यामिनॅ भॉट्या पदोर आपले तरून पोसल्यात. बिझनेसमिनॅ पन खुब जनाई भोटी मजल मारले. आपल्या समाजायी अहीस प्रगती हॉत रेवो आन आपली संस्कृती टिकॉन रेवो…