लेकीआ प्रेम – बबन रॉड्रिग्ज (बबन गुरुजी) पहराव, नंदाखाल
आय मॅलॅला वहरे जाले तीन
तिगाळपासून हाल हॉतॅत बाबाशॅ माज्या
आय बाबासॉ लाडकॉ ना पूत
आख्खॉ दी पॅऑन तॅला मीळॅ नाय सुद
बाबाला नाय हारका खादो गा प्यादो
फाटलेली सादर दिले तॅला नीजॅदो
वॅळासॉ वेळ काडॉन मायारा मॅ जातॅ
बाबाशॅ हाल बगॉन, जीव खालावर हॉतॅ
आंगाबुडसा कथान मॅ जाऑन धवॅशी
शा करॉन तॅला मॅ हळूहळू पाजॅशी
बाबाशा घारा जाले सगळी डांबाडोळ
मॅ जाऑन करॅशी बाबाशी आंघोळ
इ सगळा करता करता बाबा माला बॉलातॅ
अॅकलॉ परमिसर तूआस लो बरा करदॅ
बाबासॉ आसिर्वाद फुकाट नाय ना गॅलॉ
तिहर्या दिहा बॉठॉ पॉर कामाला लागलॉ.