उठवॅ नाय – आब्राहाम तुस्कानो, घॉटखाल, नंदाखाल
शिजू – उठवॅ नाय माला बॅहवॅ नाय
माथॅशी गव माला काडवॅ नाय.
दॅवा रे बोरिंगसॉ पानी माला भरवॅ नाय.
दुमा – उठवॅ नाय तुला बॅहवॅ नाय
माथॅशी गव तुला काडवॅ नाय.
तुला लो भुजलॉ पापड तुला मॉडवॅ नाय.
शिजू – लाती मारता तु मूकॅ मारता
बायका माहनाय तु ठॉशॅ मारता
तुआ रॅ हाताअॅ कुडकॅ कतॅ हॉयदॅत रॅ
दुमा – खॉलॅ बगॉन मॅ मंबय जातॅ
दंडुबोंडे विकॉन पैशॅ हाडतॅ
औदासा माआ मुंडोर तु बॅहॉन खाता
शिजू – खपॉन धपॉन माआ घर भरला
टुकॉन वाडवॉन माला वाडविला
आरॅ तू मावलीला गॉड कतॅ हॉयदा रॅ
दुमा – दॅवळा जाता तू रावळा जाता
मावलीला गॉड माला कादो करता
तूआ लो माथॅव गॉटॉ मॅ करतॅ लो
शिजू –ताडी पेता तू दारू पेता
हांज हाकाळ तू फूगॉन येता
आरॅ तू दारू पॅऑन तू पीकलॅआ रॅ आज
दुमा – वेनी करता तू फनी करता
आख्खॉ दी तू नुसती मिरवाता
आला तू साऊळ खाऑन तू फुगलॅ लो