नॉस्टॅल्जिया….! – संगीता वाझ.
सादारन १९८४-८५ मा मामानॅ SONYऑ कलर टिवी हाडलॉ अन मामारा घरात नुसती जत्रा फुल्या लागली. तिगाळा गावात अॅक-दॉगा घारास टिवी अहॅसॉ आन तॉ पन ब्लॅक एन व्हाईट. कलर टिवी मंजॅ बो भारीस गोस्ट. तॅ गावशॅ गव, बायको, तरुन आन टारेटुरे.. बवतेक आख्खॉ गाव दर हीनवार-आयत्वार टिवी बग्या जम्या लागलॉ. तिगाळा हीनवारॅ हांसॉ ४.३० ला मराठी आन आयत्वारॅ हांसॉ ५.३० ला हिन्दी पिच्चर दावडॅशे. एक दी साप्ताहिकीत हांगीला गा, हिन्वारॅ ‘पिंजरा’ आन आयत्वारॅ’दिल अपना और प्रीत पराई’ पिच्चर हाय.
जाला… गावात खैताळॉ पडलॉ. जकलेस हीनवारशी वाट बग्या लागले. बॉठ्ठ्यांना उठ-बॅहॅ लाग्लोतीस पन तॅँआहून जास्ती आमा लान्यांना होस जाल्ती. आमाला पिच्चर मीनसा बो कय कळात नॉता. पन तिगाळा अमिताबच्चनशी ढीश्युम ढीश्युम फायटिंग बग्या आवडॅशी. हां, तिगाळा तॉ आमश्याकरता अमिताभ नाय, तॅ अमिताबच्चनुस हॉतॉ. शेट्टी, प्रान, प्रेम चोप्रा यांसा कुसकापन आन हेमामालिनी, रेखा यांशॅ नास-गानॅ जाम आवडॅशॅ. आमाला ता तॉडास कळातोता.
अॅकदासॉ हीनवार उजाडलॉ.. शार जालॅ आन मामाआ माळोर हळूहळू गावकरी जम्या लागलॅ. साडेशार पोत हॉल फुल्ल. टारेटुरे, बायको, तरुन भुयोर. डोकरे आन घरधनी वरती खुरशीत. पिच्चर सुरु जालॉ. गान्याला शिट्यो पड्या लागल्यो. संदयाऑ तॉ वॅगळॉस विचित्र नास बगॉन जाम हावा येतोता. पन जकले बोठे माहने एकशिती हॉऑन पिच्चर बगीतोते बगुन आमेपन गपशुप बेहेले.
हळूहळू पिच्चर रंगात आलॉ. मास्तरला पोलिसाई धरलास गा आन सॉक्काट जाला. ‘सू… सू..’ ऑहॉ नाकुट सड्विलॅव आवाज या लागलॉ. तोंडोर लुगडॅव पदर धरॉन बायको रड्या लागल्यो. एकदासॉ पिच्चर खपलॉ. जॉ तॉ ‘बो भारीस पिच्चर’ बॉलात बॉलात जिनॉ उतरॉन घारा गेले आन अडे मामा पॅटलॉ. मामाआ आख्ख्या हॉलभर आन बीथीओरनाकुट हिकारलॅआ शित्र. मामाआ जीवासॉ नुसतॉ संताप. दुहरॉ दी आख्खॉ सफाईतुस गॅलॉ.
हांश्यापारा माकून तेस लोक. तिस गर्दी आन तहीस बैठक. फक्त पिच्चर आतॅ तॉडॉ वायलॉ. पिच्चर सुरु जालॉ. राजकुमारमिंसॉ डॉक्टर बगवात नॉतॉ पन मीनाकुमारीमिंशी नर्स बगॉन मनपॉट भरातोता. पिच्चर रंगात आलॉ. एकासे बढ्कर एक गानॅ. डॉक्टरसा लगीन जाला. ती नादीरा आलीस गा आन माकून सॉक्काट जाला. हळूहळू ‘सू..सू’ ऑँहॉ नाकुट सडवीलॅव आवाज, तोंडोर लुगडॅव पदर धरॉन बायकाआ रड्ना….
आतॅ मात्र खुरशीत बॅहलॅल्या मामाआ डॉखा फिरला..
“इखरिश्यांदो- अक्करमाश्यांदो रडात्या कादो. ? तॉ पिच्चर हाय. खॉटाय ता जकला. काल मा घराई वाट लाविली तोडी बास. आज कुनॅ नाकुट हिकारला तॅ परत अडे अज्जीबात उबी करॅसॉ नाय आत्तॅस हांगॉन ठवीतॅ…!”
मामानॅ आहा हांगता बरबर बिशार्यो बायको रडता रडता पदरालास………….!! पुडश्या आयत्वारॅ जकल्या लाडकॉ अमिताबच्चनसॉ ढीश्युम ढीश्युम डॉन हॉतॉ ना… रिस्क कुन घेनार ना..!