माळयश्या बंदोरनॅ – ईनास तुस्कानो, गाहा, ९२२६७६४३७८.
नावात का हाय… ग्रेट रायटर विलियम शेक्सपीयर, त्या “रोमीयो आन ज्युलेट ” नावाश्या नाटकात हांगातॅ….की नावात का हाय…? या ऊल्टा एक बो बॉठ्ठॉ फिलॉसॉफर हांगातॅ… या जगात तुमाला जक्ल्यात प्रिय नाव जॅ कुहना वाटातॅ हायदॅ… तॅ ता “तुमश्या पॉत्या नाव.”
१९८३ साल. मॅ १०वी ला हॉथॉ ‘होली क्रॉस हायस्कुल, निर्मळ’ ला. ऑहॉस एक दी फ्री लेक्चर हॉथा. वर्गात टिचर आली नोती. मॉनिटरला कुन झ्याट जुमानीत नॉता. आख्ख्या वर्गात नुस्ती धम्मासकडी सल्लोती. “धनी नाय पाशी, त्या शेत कुन कशी.” पाखे जे फुटलोते सगळ्यान्ना. कारन १०वी ला होथे ना ! पॉर तॅ पॉर बाबा. कारन तॅ निंबरमुंड्डॅस. पन पोर्यो पन कय ‘कमी दिहाश्यो’ नोत्यो. त्यांई तॅ मावरा बजारुस भरलोतॉ वर्गात.
आमश्या वर्गात फ्रान्सीस नावासा पॉर जामुस अतरंगी. मिमीक्री करन्यात एक नंबर. ता ऊठॉन फळ्या वरती ‘क्ष’ टिचरशी मिमीक्री करतोता. बरे दा-एक मिंटे आमी ती मजा बगीतोते. प्रिंशिपॉल मस्कर्निस फादर मांगनॅ यॅवॉन कतॅ दारा ऑळ्या उबी रॅलॉ ता आमश्या कुनास गाई नाय. बरा मिनीट बर फादरनॅ त्यायॅ वांदर-साळॅ बगीलॅ आन बोलवीला त्याला वर्गा बार. पयलॉ फादरनॅ त्याला ठेवनीत्सॉ परसाद दिलॉ.फादरशी मार्याशी पद्दत मिंजॅ, मुठ बंद करॉन मिंसा बॉट आन आंगठ्या मॅरसा बॉट पॅरात्नॅ वाळॉन टपकन टाळु मिनॅ टॉलॉ. या वाराला एक तॅ डॉळ्या पुडॅ काजवे समक्याशे….नाय तॅ टुमनीत मुतॉ.
बारक्या फराशाई (फ्रान्सीसशी) खॅम बॉठ्ठ्या फराशीनॅ (फादरनॅ) हारकी हुरकी घेथ्ली. आन लगोलग त्याव हावुरॉ पन कॅलॉ, मिंजॅस वरांड्यात मांडी घाल्या लावीला. फादर बिया वर्गोर जादो वळ्या लागलाॅ आन परत मांगुलवाटॅ फिरलाॅ. आमाला वाट्ला फ्रान्सीसशी ‘घोडी आतॅ हम्दावली.’ फादरनॅ परत त्याला तॉड्यास रागायॅ विसारला, “नाव का रॅ तुवा ?”
तॅनॅ ‘फरशा’ हांगता खुटी आमश्या बॉठ्ठ्या फरश्या (फादरश्या) पॉटात केळे कालवाले. तॅनॅ बारक्या फरश्याला ताबडतोप शिक्षा माफ केली. ऊठवीला आन त्याला हांगातॅ, “कॉडा मस्त नाव दिलॅ तुवा बय-बाबानॅ तुला ! क, त्या नावाशी बदलामी करता ? आपला फरांशीस नाव कॉडा ग्रेट हाय. नाका त्या नावासॉ सत्त्योनाश करॉ. नाय तॅ नाव तरी बदल तुवा आजपासून. आन आजपासून पुडे खोडी करॉ नाका. त्या पाठीत प्रॅमायॅ थॉपॉ मारलॉ न त्याला हांगातॅ जावॉन जाग्योर बॅहॅ हॅवसॉ दॉक. फादरला त्या पॉत्या नावासॉ कॉडॉ अभीमान. आन यॉ वॅडॉ शेक्सपीयर का हांगातॅ, जॅ नावात का हाय भगुन ?