विनोदी कान्यो – बबिता राजेश डिसोजा, वाघोली
बाबा : फरशा आपल्या भाटात लॉंगरा पिकलॅ.
फरशा : बाबो, काल मॅ लॉंगरा भय्याला दावडला… पन सवदॉ कय पटलॉ नाय.
बाबा : फारशा, पिकला पान गळातॅ ई माईत हॉता रॅ….. पन पिकलॉ फनॉ कहॉ गळालॉ.
फरशी : बाबो, फनॉ कय गळालॉ, बिळालॉ नाय… तुमसॉ ऑ पुत वरसॉ फनॉ घॅऑन मरी बायश्या घारा दारू घ्यादो वळालॉ.
__________________
बाबा : हन हन पेटीऑ खन
पोरी : बाबो मिनजे का?
बाबा : आतॅ नाताळ सॉ हन आलॉ गा तुला फराक, तु बयला नवा लुगडा, तु आयला साडी, मादो पोन्या.
पोरी : आनी बाबो, मा पपाला.
बाबा : तू आयसॉ नवरॉ कय हाडतॅ गा, आयतवारसा मटन तॉडा बरबर न सुकता हाडतॅ. बी तॅला हन – बीन कय कामा धावपळीत माईत पडात नात.
बय : तॉ देवळा जातॅ ना. पोरे, आतॅ नाताळ सॉ हन आलॉ…. मिनजॅ मा पेटीऑ खन खाली हॉयदॅ.
हॉवॉन जाऊदे खर्च.
खित
बो हाकोटे गॅसवर शा ठविलॉ, गा माला तु फुक मारॉन सुलीओर शा ऊकळविताना दिखाता.
सपाती भाजी खाताना बो तू हातशॅ पॉळॅ, जॅला शंभर भोके, तू शा मिनॅ बुडवॉन माला देतोती, तॅई माला आठोन येते.
घरशे कामे आटोपॉन, रस्त्याकडॅनॅ खॉयारा गुंडाळॉन देवळा जाताना बो तू माला दिखाता.
ता खॉयारा या थंडी दिहात बो तूला ऊब देतोता ई माला आतॅ जाणवातॅ.
दॉपारश्यापारा तू हातात सुवार्ता घॅऑन, तॅआमिनशॅ फोटो बगताना, सोळी हिवताना, बो तु माला आतॅ रिकाम्या हिंदाळ्यात दिखाता.
तू हाताशॅ वालाय गॉळॅ घालॉन केलेल्यो धापट्यो, सुलीवर भुजीलॅलॅ खॉल्याशॅ पालगे, कॉरास्मात उपास होडताना, बो तूई माला आठोन येतॅ.
लानपनी बो तु आमशे खूब नेलवाड कॅलॅ, तुआ आजारपनात आमे तुआ मॅरॅदॅरॅ बेहले, तुई सेवा केली, तुआ हरी वार्ता केल्यो, अडेस आपली जकली वजाबाकी जालती.
तरी बो माला तुई खुप खुप आठोन येतॅ.
रॉज सातशी आयमेरी जाली, आठसा देवळा घाट वाजला… गा हातात रोजरी घेतलेली बय, तु माला गळ्यात रोझरी घायलॅल्या मावली मिनॅ दिखाता, आनी बो, तुई आलेली खित माई अडेस मॉडातॅ.