जीवनाई संजीवनी – फा. (डॉ.) रॉबर्ट बी. डिसोझा, पसायदान, नाळे
दामूकाका आज कॉरॉ हॉतॉ. माथ्याला तॅल लावॉन माथा उकलॉन दारपूडशा बाकोर बॅहॅलतॉ. दापुडनॅ जन्याकाका जातोतॉ. दामूकाकाला बर्या कपडॅत शकाशक बगॉन जन्यो बोयलॉ, ‘दामुआ कडॅ साल्लॉ?’ दामूकाकानॅ तॉंड पाताळ कॅला, ‘कडे नाय, आज आमसॉ एक दोसत यासॉ हाय गावड्योरनॅ. तॅआ हरी भय बगॅआ जासा हाय.’ मॅरनॅ शिमू जातोतॉ. जन्यो शिमुला हांगातॅ, “बग ऑ दामु कॉडॉ सुदारलॉ तॉ. नाय तॅ तू? घारादारा साप सॉकाट कॅला.” शिमूइ सटकाली. खांदयोरशी कावड बाजूला ठवीत तॅनॅ कब्जाआ खिशातसा पइट काडला.
शिमूआ हाथात ता दारूआ पइट बग्तास दामु ओट्योरनॅ खाला उतारलॉ. “शिमूआ मॅ तूआ पाया पडॉ गा ? ता पइट गटारात उडवॉन दे. या दारूनॅ मा साप वाटॉळा कॅलॅ. मा ऐक. ए जन्या, तॅआ हाथातसा ता पइट घेऊ.” दामूकाका काकुळतीला यॅवॉन बॉलातोतॉ. ता बगॉन शिमू बगितुस रॅलॉ. तॅला त्यावॅळॅला कयतरी वाटला. गटार अमाशा हवूदे गा पितर अमाशा, दामु सतत गटारातूस पडलॅलॉ. अह्यासॉ. आज ऑ माला दारू प्यादो बन करतॅ, दारूला गाळयो मारतॅ मीनजॅ यामीनॅ खरोखर बदल जालॅ. तॅनॅ ता पइट ताहास कब्जाआ खिशात ठविला. तॉ दामुआ हाथात हात घालॉन ओट्योर सडलॉ. जन्यो तॅआ मिंगारनॅ पायर्यो सडॉन दामुआ ओट्योर आलॉ. दामू बाकड्योर, शिमू हिंदाळ्यात आन जन्यो भुयोर अहे जकले बेहेले.
‘आरॅ दामु’, शिमूनॅ विषयाला हात घायलॉ. “तूआ मिनॅ एकदम ऑडॉ बदल कॉहॉ का जालॉ.?” दामूनॅ हाथाय तॉंड ढाखिला. तॉ लाजल्याहारकॉ मान खाला घालॉन बॅहॅलॉ. तव शिजूकाकय घरातनॅ बार आली. “बाप्पा रे, आज इ जकली कंपनी अडे का करतॅ ? थांबा जकल्यांदो शा करतॅ. बिन दुदाओ सलदे ना ? दूध आला नाय आज.” जन्यानॅ टॉलॉ मारलॉस, ‘सलदे गनी, नाय तरी ऑडे वहरे या शा शी कुनाला आठोन तरी होती आ? दामूनॅ फरशी घारा सकर्यो कय कमी घायल्यात गा ? हांज नाय, हाकाळ नाय, दॉपार नाय, तिपार नाय, टाइम नाय, सुमार नाय, जिगाळा बगॅ तिगाळा फरशीआ घारास पडलॅलॉ.” शिजूकाकायनॅ तॅला मिन्नॅस थामविला. ‘कुनॅआ ! मॅ तुमशा सब्दाआ आड येतॅ पन आज दोन मयनॅ हव्यादो आल्यात, याई टिमकॉ सुदा घेटलेली नाय.’ शिमूनॅ मिनॅस तॉंड घायला, ‘दोन मयनॅ ? आला माला दोन तास भारी पडलॅत. तुमॅ का इलाज कॅलॉ माला तरी हांगा ना कुमारे.”
तॅयो वार्ता रंगात आल्यो तॉस शिलूकाका तडे हजर जालॉ. शिजूकुमारी घारात शा कर्यादो गेली. शिलूकाकानॅ जकल्याइ खबारबात घेटली. ‘दामुआ, काहा का सल्लॅ? शोवीस तास फक्त आजसॉ दी कॉहॉ का वाटलॉ आपलॉ प्रोग्रामू? शिलूकाकानॅ दामू दरी सौकशी केली. ‘तुमा जकल्यांना माइ कानी माइत हाय. दामूनॅ हांग्या सुरवात केली, ऑ शिलू माला दोन मयन्याआदी भॅटलॉ, फरशीआ घरनॅ मॅ जकल्याइ वाईल काडीत घारा येतोतॉ. माइ झॉक जातोती. शिलूनॅ माला घारा पोशविला. शिजूला हांगीला, ‘याला कय खा प्यादो दे आन निजूंदे. मॅ उद्या हाकोटे आलॉ.’ मा डोळ्योर कानसोळी आल्ती पन कान साप हॉथॅ गनाय. मॅ ता आयकीला आम विसार कॅलॉ, ‘शिल्या तु जाय रॅ. कुनाऑ बाप जरी आलॉ तरी तॅला पुरॉ पडनॅ. तु का समजालॉ.’ शिलू कॉपात तुमी कय वाईट वाटॉन घॅऑ नाका. पन दुहर्या दी तुमी जर आलॅ नसतॅ ना तर आज मॅ कडॅ कॉपरॅअॅत पडलॉ असतॉ ता मॅ कय हांगुस शकॅसॉ नाय.’ दामूआ इ बॉलना आयकॉन शिमू आन जन्यो शिलूकाका तोंडोर डॉक्या लागलॅ. शिलूकाका कडेतरी मीटिंगला जातॅ इ तॅंआ काना आल्ता. ‘शिलूआ,’ जन्यानॅ तॉंड उगड्ला, ‘इ जादू तु कही का केली ? आमाला जरा कय हांग ना.’ तौस शिजूकाकय शा शे कोपे आन तळनायो रोटयो घॅवॉन आली. शिमूआ तॉंडाला जाम पानी हुटलॉ. ‘कुमारे, यो रोटयो कडश्यो?’
‘मा मायारा लगीन आला गना. हाऊरॉ केल्तॉ. तुमी शा घ्या.’ आहा हांगॉन शिजूकाकय आतलॅंगा गेली.
दामू, शिमू, जन्या आन शिलू जकल्याइ दोन-दोन तळनायो रोटयो आन एक एक कॉप शा सा तडकायलॉ. तॉंपुहीत शिमू हांगातॅ, ‘दामूआ कुमारीनॅ शा मस्त केल्तॉ हा.’ जन्यो मिन्नॅस बोयलॉ, ‘ता जक्ला रेओंदे. शिल्या आमाला इ कानी हांगु.’ शिलू काकानॅ दामूओर बगीला. दामूनॅ तॅला हळूस डॉळॉ मारलॉ आन मुंडी हालविली. तॉहॉ शिलू काका बॉलतॉ जालॉ.
“ताहा जॅ बगीला ना तॅ इ दारू हॉड्ना ऑडा कय जड काम नाय.”
बरोबर! मॅ किती वखत हॉडॉन दावडली बगा गनी” शिमू हावात हावात बोयलॉ.
“पन ती होड्ल्योर तीआ पासून लाम रॅना जिकरीआ काम हाय. तॅआ करता आमशा मीटिंग मिनॅ फक्त आजसॉस दी दारूआ विखारी घॉटापासून आमी लॉकांना लाम रॅआ हांगातॅव.”
“मीनजॅ दररॉज ताहा करॉन दारूपासॉन कायमसा लाम रॅसा? इ कुना बापाला नाय जमॅसा.” जन्या बोयलॉ.
हा. आज कॉबडा लोक एक-एक दिहाशा हिसपानॅ १०, १५ , २०,२५, ३०-४० वहरे दारूपासॉन लाम रेले.” शिलूनॅ मत मांडीला.
“शिलू हांगातॅ ता बरबर हाय, आतॅ माइस वार्ता हांगातॅ बगा. मॅ एक-एक दिहाशा हिस्पान ६० दी मीनजॅ दोन मयनॅ दारू पिलेली नाय.” दामूनॅ आपली हकीकत हांगिली.
‘पन माय कय मित्र हात तॅंआहरी मॅ खुब वॅळा दारू पिले. कतॅ कतॅ तॅंआ पैशान पन पिले. आतॅ मॅ जर होडली तॅ ते हांग्या लागॅद्यात की, बगा, यानॅ आमशा पदरशी पिली आन आतॅ आंगोर आला भगून ऑ दारू हॉडॅसा ढॉंग करतॅ.’ शिमूनॅ जकल्या पूडॅ मन मॉकळा कॅला.
शिलूकाकानॅ तॅइ समजूत काडली, ‘ पयली गोस्ट मीनजॅ आपली विसार करनॅइ पद्धत आपुन बदल्या पाय. शिमूनॅ हांगीला तॉहॉ विसार कॅलॉ तॅ इ दारूआ राज आहास सुरू रॅनार. तॅत कॉड्या लॉकांव बळी जातॅ मायती हाय गा? दुहरी गोस्ट, आपुन दारू होडत्याव ती कुनास करता नाय आन कुनास भरोश्योर नाय. जॅनॅ तॅनॅ आपलॉ निर्णय घ्यासॉ आन तॅइ आख्खी जबाबदारी सॉता घ्याशी.’
शिलूकाकाआ बोलन्योरनॅ जकले विसारात पडले. दारू हॉडॅशी हाय खरी पन तॅआ आदी बरॅस प्रश्न हॉडव्या लागणार इ जन्या आन शिमूआ धॅनात आला. तॅआ मीनॅ बी दोन मयनॅ दारूआ घॉटापासून लाम रॅलॅलॉ दामू आतॅ सुदारलॉतॉ. शेवटी दामूनॅ तॅतनॅ उपाय काडलॉ., “शिलूआ, या हॉमवारॅ आपुन जन्याला आन शिमूला ए ए शा मिटिंगला यासा वारना दिलोसा तॅ? अरे तडे ज्यो साक्षी देत्यात ना त्यो आयका बास. दारू होड्ल्योर कॉड्या लॉंकाये संवसार माकून उबॅ रॅल्यात. त्यायो तब्येती का जाल्यात!
त्याय पैशॅ कॉडॅ वासल्यात ! त्याये बायकू पोरे मॅरॅदारॅ हात. लॉकां मीनॅ तॅंन्ना कॉबडॉ मान मिळातॅ ! तॅआ जीवनाला कोडी शिस्त आले.” दामू बॉलातूस रॅलॉ…. जन्या-शिमू बगीतुस रॅलॅ….. शिजू काकय शा शे रिकामे कोपे घॅवॉन गेली. शिलूकाकानॅ जन्या-शिमूला विसारला, ‘आतॅ का विसार हाइ ?’ जन्यो बोयलॉ, ‘आतॅ एक एक दिहाशा हिस्पान माला या दारूआ विखारी आन सत्यानाशी घॉटापासून लाम रॅसा हाय.’ शिमू हांगातॅ, ‘मॅ पन मिटिंगला अॅनार.’
आजशी ए ए शी मीटिंग बेताम रंगात आलती. शिलूकाकाव ३५वॉ, दामू काकाव १५वॉ, जन्या काकाव १४वॉ वाड दी साजरॉ करॅदो जकले तॅंआ गावातशा हॉलमीनॅ जमलोते. पावलू कॉपातनॅ अॅकॅका नाव घॅऑन तॅंन्ना पूडॅ बोलविला. तॅआनंतर शिलूकाका, दामूकाका, जन्यो आन
शिमू यांना केक काप्यादो पूडॅ बोलविला. केक कापॉन जाल्योर तॅंन्ना टोकन दिलॅ गॅलॅ. मंग एकेकाई साक्ष दिली. तॅंआ कुटूमाशे थोडे लोक पन आज मिटिंगला आलतॅ. तॅतशा दॉगा-तिगाई साक्ष दिली. इ जक्ला सुरू असतानास पावलू कॉपातनॅ नवीन सभासदाये नावे घॅवॉन तॅंआ स्वागत कॅला आन तॅंन्ना माकून माकून मीटिंगला यासा वारना दिला. इ मीटिंग मीनजॅ ए ए शा जीवनाई संजीवनी हाय. मीटिंग बरी जाली हायदॅ तॅ तॅआ श्रेय दॅवा कृपेला दॅवॉन पावलू कॉपातनॅ मनशांती पराथना घेट्ली.
दॅवा, जॅआ परिस्थितीला आमी
बदलू शकाव नाय
तॅआ परिस्थितिऑ स्वीकार करॅशी
मनाई परसन्नता आमाला दे.
जी परिस्थिति आमी
बदलू शकातॅव
ती बदल्या दो आमाला हिंमत दे
आन या दोन परिस्थितिमीनसॉ
फरक आमाला हुमजावॉ
तॅतॅन आमाला बुद्दी दे.
जकले बोयले : – येत र्या… येत र्या… येत र्या….