अॅका परिकशेई तयारी करताना मॉबाईलवरनॅ जॉनशी ओळख अॅका पोरी हरी जाली. अस्तॅ अस्तॅ मैत्री ओडी वाडली गा जॉन तिला जवळशी मैत्रिन मानतॉतॉ. तॅनॅ दी भरात का का कॅला ता आख्खा तिला हांगॅसॉ. तीनॅ का कॅला ता वीसरॅसॉ. ती पन तॅआ हरी बरास बॉलॅशी. ती तॅआ मॅरशा गावात रॅतोती. जॉन आख्खालॉ दी तीआ हरी बॉलात बॅहॅसॉ. ती तॅला जामूस आवड्या लागलोती. तॉ हमी हमी तीआ हरी फोनवर बॉलॅसॉ. तिला पन आतॅ नाख्खॉडा जानव्या लाग्लोता. कारन तॉ वागातोतॉस तहॉ. एक दी तॅनॅ तिला भॅट्या बोलविला. तीआ करता ऑ नवीनुस माहनू हॉतॉ भगून ती गेली तिला तॉ खुब बरॉ माहनू वाटलॉ. आन खरास जॉन सॉभावानॅ हॉतॉ पन तॉहॉस. जॉननॅ तिला हांगॉन ठविलता, ‘तुला जॅ कतॅ अॅखादॉ शरीराऑ किडनी हारकॉ अॅखादॉ भाग लागलॉस तॅ तॉ मॅ देनॅ.’ ऑडॉ तॉ तीओर प्रेम कर्या लागलॉतॉ. अहा करता करता तॅँआ मैत्रीए पास वहरे भरले.
जॉन तिला हमी खुश ठवॅसॉ आन तॉडॉस तिला घाबरॅसॉ पन. पास वहरात ती तॅला किती वॅळा भेटली, तीआ तीऑ वाड दी, तीआ घरश्यांव वाड दी अहा जक्ला कय तॅनॅ लिऑन ठविलता. तॅआ मनाहारका ती नाय वागली गा ऑ जाम रागवॅसॉ पन तिला तॅऑ कय फरक पडात नॉतॉ. जॉन तीआ हरी जाम जाम बॉलॅसॉ, एकदा तीनॅ तॅला हांगीला मा हरी बॉलॅसा बन कर. पन तॉ कय आयकात नॉतॉ. लगीन करनार तॅ यास पोरीआ हरी आहा तॅनॅ ठरविलता. ताहा तॅनॅ तॅआ अॅका मित्राला तीआ बद्दल जक्ला हांगिलता. तिगाळास तॅआ मित्रानॅ, ‘तू ऑ जक्लॉ विसार मनातनॅ काड आन अब्ब्यासाओर बग’ आहा हांगॉन चूप कॅल्ता. पन जॉनला कय कॅल्या रॅवात नॉता. तॉ फोनमीनश्यो शायरी शॉदॉन तिला धाडॅसॉ. तॉ तॅव अब्ब्यास बाहॉन गेल्तॉ.
जॉन तॅ तिला बॅतान कय हांग्योवता पन तॉ हांगू शकात नॉतॉ. भगून तॅनॅ ता शारपास जागी ता लीऑन काड्लोता. जॉन तॅआ पोरी करतान वॅडॉ जाल्तॉ. तॅला तीआशिवाय रॅवात नॉता. आन तॅआ बनॅ अब्ब्यासु हॉत नॉतॉ याव घाबरॉ पन हॉतॉ. इ जक्ला सुरू असतानास एकदी तॅआ पोरीआ हैरा जालॅइ बातमी आली. आन हैरा जाला ता पन नॅम्का जॉनशास गावात. जॉन तीआ करतान खुश जालॉ पन सॉता करता तॅआ मन रंजी जाला. ती तीआ हार्या या लागली आन अडॅ माआस गावात माइ आन तीइ भॅट कही हॉयदॅ ऑ जॉन विसार करतॉतॉ. मंग तीआ हैर्या दुख मनात ठवॉन तॅनॅ माकून अब्ब्यासाला सुरवात केली परीक्षा तन दिली. आन तॉ तॅआ कामाला लागलॉ.