आमंत्रण !  – सिरील मिनेझीस

            एक जवळसॉ मित्र घारा आलॉ आमंत्रण करॅदो. तॅआ पॉराआ वराड हॉता. आपला आमंत्रण फिक्स हॉता. तॅनॅ कंकोत्री दिली, आन हांगीला आपलॉ प्रोग्राम हीनवारॅ हांसॉ हाय. यासा. तॉ गेल्योर मॅ कंकोत्री बगिली, त्योर लीविलता आयतवारॅ दॉपारसॉ प्रोग्राम हाय भगून. आतॅ माला प्रश्न पडलॉ, माला हीनवारॅ आमंत्रन दिलॅ (कादो ता तुमशा ध्यानात आलॅ हायदॅस) आन पत्रिका दिले, त्योर आयत्वारसा आमंत्रन हाय.

         आपलॉ जूनॉ काळ आठवालॉ गा तुमशा ध्यानात येदे गा तॅआ काळशा आमंत्रनात आन आजशा आमंत्रनात जमीन आस्मानाऑ फरक हाय. तिगाळशा काळात आपल्यो बयो मटन बनव्याश्यो पन तॅआ मटन कतॅस बॅकार हॉअ‍ॅसा नाय, पन आतॅशा कॅटरसला कुनुस अव्वाल जीवान कॅलॅ आहा बॉलॅ नाय. तहास या आमंत्रना हाय. तिगाळा एकेका घारा तीन तीन आमंत्रन पॉशॅशे. एक वरमायसा, दुहरा पॉरा  नातॅ पोरीआ आन तिहरा गावकर्‍या. आमंत्रनाला पन तीन मन वजान अहयासा. आतॅ काळ बदाललॉ आन आमंत्रनाइ पद्दत करोनानॅ पार बदलली. आमसॉ एक मित्र हाय तॅआ दारा पूडनॅ आमंत्रन करनारॉ गॅलॉ तरी तॉ तॅआ वराडाला जासॉ. कुनॅ विसारला तॅ तॉ हांगॅसॉ, ’तॉ माआ दापुडनॅ गॅलतॉ’… असो….

         आतॅ कोरोना निमतान आमंत्रनाइ पद्दत आपसूक बदलली. लिमिटेड पन्नास माहने ठरले, गावकरी भाहाले. बचतुस बचत ! आन आमंत्रनाइ पद्दत पन का ? “लग्नाला यासा हा. आमसॉ हिन्वारॅस प्रोग्राम हाय, फेरी मार.” आतॅ मॅ फेरी मारॅदो, कय सायकली ऑ विक्रम कर्‍या लागलॅ गा का ? तुमॅ करोना निमित करॉन जॉ आटोपशीर प्रोग्राम करॅ लावीलॅ ता ठीक हाय, पन आमंत्रन जरा हारका करा गनाय. तुमसॉ प्रोग्राम लानॉ हाय तॅ ताहा तुमॅ स्पष्ट हांगा गनी….  “माऑ प्रोग्राम लानॉ हाय भगून तुआ अ‍ॅकलॅलास आमंत्रन हाय” आहा स्पष्ट हांगा. कुनालास राग यासॉ नाय. नीट आमंत्रन होये नाय भगून लोक येत नाय आन मंग आजकाल कानोर पडातॅ गा अमुका घारा सैपाक रॅलॉ. जहे आमंत्रन करनारे सुकातॅत तहेस आमंत्रन घॅनारे पन सुकातॅत. या बाबतीत मॅ वाडवळ समाजाला बॅताम मानतॅ. तँना तुमी आमंत्रन करॅ जा, तॅआ भावकीत जॅ वराड हायदॅ तॅ ते स्पष्ट हांगातॅत, ‘ओय मी तुआ घरा वराडाला यासा नय, आमशा बायशा मॅरॅ पन वराड हाय.’  आहा स्पष्ट हांगनारा माहनू ते हिशोबात धरीत नात. पन आपल्या कुपारी समाजात, अ‍ॅखाद्या घारा जरी वराड हायदॅ तरी तॉ हांगातॅ, ‘मॅ फेरी मारनॅ.’  आहा खॉटा आश्वासन देते आन तास नडाते अन्नाई नासाडी हॉया. 

          मंडळी… कोरोनामुळॅ अगदी कमी पै-पाव्ने घॅऑन लगीन सॉहळॅ जालॅ. आजपन कय ठिकानी हॉतॅत, इ आनंदायी गोष्ट हाय. पन आमंत्रन करताना स्पष्ट आमंत्रन करा. तुमाला अ‍ॅकालास आमंत्रन करॅसा हायदॅ तॅ ताहा स्पष्ट हांगा. कुनालास राग यासॉ नाय. जुन्या काळात आमंत्रनाला कोडी आपुलकी होती पन ती आतॅ रेली नाय. माहने शिक्षित जाले, पन मानूसकी नाय बदालली. काळ बदाललॉ, वेळ बदालली. जुन्या माहना दरनॅ लग्नाव सैपाक बनव्याशी कला आपुन नाय घेट्ली भगून आतॅ कॅटरस श्योद्या लागातॅत. आत्याशा रोटयांना तिगाळशा हारकी सव नाय, कारन बनावनारॅआ तॅआ बय दरनॅ आपुन रोटयाव फार्मुलॉ घॅटलॉस नाय. ताहास या आमंत्रनाआ हाय. आमंत्रन काहा करॅसा इ आपुन समजॉनुस घॅटला नाय. मंग का हॉनार ? एक तॅ लोक कमी येनार आन सैपाक रॅनार नातॅ लोक घना येनार आन सैपाक खुटनार. 

         आतॅ आपल्या कंकोत्री मिनशी एक ओळ कमी केली पाय… “वरील विनंतीस मान देऊन सह कुटुंब, सह परिवार येण्याची कृपा करावी.”