हाकोटे देवळाशी घारा आली आन ओट्योर सडातॅ बास तव दुमी बयला मांगनॅ हाक आली. मॅरशी कती काकय धाहात आली आन हांगातॅ, ‘बय जरा माआ घारा डॉकाव सल ना..’ दुमी बय विसारतॅ, ‘कला, का जालॅ…? ओडी घामाघूम कदो जाल्या..? पोरीला काय बरा-बिरा करी नाय गा का ? मॅ थॉड्या वॅळानॅ आंग धॉया यॅस गनाय, मंग तू आतॅस ओडी धाहाधाहात आली ती..?’
कती काकयशी पोरी बाळांत जालती, तीइ पोरी मयन्या भराई जाले. दुमी बय रॉज तीआ मालीश आन आंग धॉया जातोती. तिला बारक्या पॉरां कय दुखला खुपला गा का करॅसा याव जाम अनुबव हॉतॉ. कती काकय हांगातॅ, ‘माला धीर नाय आहा नाय ला पन पोरीनॅ हप्प्या रात जागॉन काडले, निजेस नाय ना. माला कय हुमजॅस नाय का करॅसा ता. बेबी बोयली, ‘आत्तॅशॅ आत्तॅ बय ला बोलव, भगून / तॅतॅन मॅ आली ला. तू सल, शा तन माआ घारा पे सल..’ दुमी बयनॅ घरा आतमीनॅ डॉकाइत खॉयार खाट्योर ठविला आन बाबाला बोयली, ‘मॅ पटकान कतीआ घारा जाऑन येतॅ.
कतीआ घारा बय पोसली आन दारातनॅस हांगातॅ, ‘बेबे कय धास्ती करॉ नाका थांब.’ आन मिंगारा हातपाय धव्या गेली. हात पुहीत आतमीनॅ आली आन बगीतॅ तॅ बेबीअॅ डॉळॅ हुजल्यात. मंग तीनॅ बारक्या पोरीला घॅटला, जकल्या बाजूनॅ हारका बगीला. हातपाय खाला-वर कॅलॅ, पॉट दाबॉन बगीला तॅ पॉट कडाक जाल्या हारका वाटला. मंग तिनॅ विसारला, ‘आख्ख्या रातीत पोरी हगिलती किती वॅळा आन मुतीलती किती वॅळा… पॉट भरला रॅलॅ.’ तॅ बेबी बोयली, ‘आज रातीत कय ऑला कॅलास नाय.’ मिंगॅ बय नॅ एक तांबड्या लुगड्याऑ हुडकॉ घॅटलॉ, सुलीओर लोडी गराम केली. त्योर हुडकॉ गिरमातॉ कॅलॉ आन पोरीआ पॉटाला हेक कॅलॉ. समशी भर जिरा भुजीला आन तॅव पानी करोन दोन समश्यो पाजील्यो.
पास-दा मिनटात पॉट साफ जाला आन थॉडॅआ वॅळानॅ पोरी निजली. बयनॅ दोन जुने तांबडे लुगडे फाडॉन हुडकॅ करॉन दिलते पोरीआ आंगाखाला आथरॅदो. तांबड्या लुगड्यात लान्या पॉरांना गॉमारला गा तॅआमिनॅ पॉरांना गिरमा बरी मिळातॅ. एकपरकारसॉ आदार मिळातॅ. तांबड्या लुगड्याव रंग उतरातॅ पन ता फाटॅ कतॅस नाय. बेबीनॅ बयसॉ फोटो बगीलतॉ तॅ, बेबी बोयली, ‘बयशा पॉरा लग्नात बय तांबड्या
लुगड्यात सॉबातॅ.’ इ आयकॉन बय बोयली, ‘इ तांबडा लुगडा, तांबडी सोळी, गळ्यात तांबडा पोवळ्यो, हॉनॅत बांदिलॅला हिरान, कानात वाळयो अहॉ आमसॉ पॉशाक कॅलॉ गा आमाला पावडर लाली लाव्याशी गरजूस नाय. आमश्या तोंडोर आपसूक तॅज येतॅ.’
तांबड्या लुगड्याऑ पदर, कानो आन मांगनॅ कहाटॉ आन निर्यो आहा जकला सापॉनसॉपॉन नीट अहला गा बायको आपोआप बांदल्या आंगायो दिखातॅत. कामे करताना कय अडसन ये नाय. लुगड्याव रंग एकुस तांबडॉ अहल्यामूळॅ एक लुगडा कॉडा वापरला ता कय हुमजात नॉता. एकदा धुईला गा लवकर हुकात पन नोते भगून बो दिहोर धव्या लागेशे. दरी बी घने लुगडे नहॅशे, दोन नवे दोन जुने. नवे बी कुनापा नहले तॅ एकमेकीए नॅहॅशे. कुना घारा जासा हायदॅ, दॅवळा-रावळा, बजार-हजार करॅ तॅ तॅआ एकास लुगड्यात फिरातोते. त्या काळात जकलेस तांबडा लुगडा, तांबडी सोळी एकसाथ कहे वाटातोते हायदॅ. लुगडा पन मांडीओर खॉशासा. आतॅ मुद्दाम फॅशन कर्या करतान हारक्या कलरशे कपडे करतॅत.
पोरे भोठे जाले मिंजॅस बयबाबा श्प्पल पॉरां पायात या लागला हा हुमजॅसा आतॅ पॉरांआ आयक्या लागॅसा. पॉरांना कय हांगॉन ते कय आपला आयकनार नाय. आयबाप पन हांगातॅत ते बर्या करतानूस. कतॅ ते शिडातॅत ता हुमजॉन घॅसा. एक म्हण हाय ‘आयसॉ राग मिंजॅ पानॅऑ डाग’ पानॅव डाग जहॉ थॉडॅआ वॅळानॅ हुकातॅ, तहॉस तॅनसॉ राग शांत हॉतॅ. भगून पॉरांई बयबाबाला समजॉन घ्यासा. पूर्वीशी वेळ रेले नाय. कुना एक पूत आन एक बाय ओडेस पोरे हात. आन आतॅआ काळात कून कडॅ जायदॅ, नाते कडॅ तुटेद्यात, कून कुनाला बाहॅदॅ ता कय हांगता यासा नाय. खरा हांगॅसा तॅ कुनाला तॅआ कय पडला पन नाय. आपलॉ कुपारी समाज मिंजॅ भारत दॅशात एक जुरूकसॉ बिंदु हाय. ये बिंदु दॅशात-बार दॅशात बर्यापैकी फॉकल्यात. पन तॉ माळीआ दॉरा घतीन जडतड्ने बांदलॅलॉ हाय. अॅकमॅकांना भॅट्ना हॉतॅ इस बोठी दॅवाई देनगी हाय. आपलॉ पॉशाक आन आपली भाशा टिकव्यादो झटतॉ हाय. तॅआ परयतनाला यश येउन्दे आन कुपारॅओ एकमेकोर जीवाळॉ वाडुंदे याकरता ब्येस.