सुकुर मावलीऑ कृपाप्रसाद — फा. फ्रान्सिस दिब्रिटो
माला आठवातॅ, तिगाळा मॅ शाळीत हॉतॉ हायस्कूलला. माइ बोठी वयनी जानुबाय इला बनू आन लुजान यो दोन पोर्यो. रितीनुसार पोर्यामांगे पॉर पावतॉ. ती बॅताम पराथना मागन्यो करॅशी. ती वागनॅनॅ बॅताम धार्मिक होती. आमशा घरापासून ५ कोसोर आगायसा सेंट जेम्स चर्च हाय. त्याकाळी उत्तर वसय मिनॅ फक्त तडेस ‘नित्य साहाय्यक मातेऑ नॉवॅनॉ हॉअॅसॉ. नॉवॅना करता वयनी सलात सलात आगाय दॅवळा जाशी. त्याकाळी रस्तॅ खराब हॉतॅ. वयनी माला, तिआ दोन पोरींना मिंजॅ माआ दोनु पुतन्यांना हरी घ्याशी. वयनीइ भक्ती वाखानन्या हारकी होती. तिगाळा ‘नित्य साहाय्यक मावलीऑ’ नॉवॅनॉ परतेक मंगळवारॅ अहॅसॉ. नव मंगळवारशी भक्ती पार पडल्योर कय आठोड्यात वयनीनॅ आमाला ‘गॉड बातमी’ दिली. वयनीला दी गॅलॅ.
वयनीऑ पक्कॉ विश्वास हॉतॉ. ती हांग्याशी, ‘माला पॉरूस हॉनार. नव मयनॅ भरल्योर वयनीनॅ पॉराला जन्म दिलॉ. तॅआ पॉराइ तब्येत सुरुवातीला नाजूकूस होती. जॅला जक्ले देव समजॅशे तॉ अरनाळसॉ डॉक्टर एन्. पी. गाळवणकर ऑ माआ बॉठ्ठ्या बाहासॉ खास दोसत. डॉक्टरांशो आमशा घारा फेऱ्यो हॉया लागल्यो. माकून आमी जकल्याइ मावलीला ‘गराना’ घायला. आस्तॅ आस्तॅ पॉराला आराम पडत गॅलॉ आन आमसॉ जीव हॅवसॉ जालॉ / भांड्यात पडलॉ. नवसाआ पॉर ! कृपेआ पॉर ! मावलीनॅ आमशी पराथना आयकीली. एक दोन वहरात नंदाखाल देवळा ‘नित्य साहाय्यक माते’ऑ नॉवॅनॉ सुरू जालॉ. तडे वयनी आन आमे जक्ले जाशे. ख्रिस्ताला आपल्या पराथनेत वरशी जागा हाय इ माइत हाय. तरीपन हरएक ख्रिस्ती लॉका काळजा कुपीत मावली करता जागा हाय. ती तही अहलीस पाय.
खुरूसा पायापा प्रभू ख्रिस्तानॅ मरिया मातेला आपली आय कॅलॅ.