लाद्रू पेद्रु – सिरील मिनेझिस, आगाशी
लाद्रू : का रॅ पेद्रुआ ? आज तुओ बड्डे. आज जिव्यासॉ का बेत हाय ?
पेद्रु : स्पेशल बेत हाय.
लाद्रू : माला हांग गनी, मॅ मांगॅसॉ नाय.
पेद्रु : तुला बन कॅलॅआ रॅ ! लाद्रूआ, आज मॅ लहनाई भाजी केले..
लाद्रू : का बॉलाता ? तुआ दरी बो नोटयो हात रॅ. पन मॅ का हांगातॅ, आपुन मट्नात भरीला बटाट टाकीत्यात ताहा तु लहना भाजीत कय टाकीलॅ गा नाय ?
पेद्रु : टाकीला नाय काहा ? मॉजॉन सव्वाशे ग्राम बकर्या मटन टाकीलॅ.
लाद्रू : ओ माज्या दॅवा ! तु आयकॅसॉ नाय. बरा पन भाजीत तांबोटा-बिंबोटा टाकीलॅ गा नाय ?
पेद्रु : आज टाकीलॅ.
लाद्रू : मिंजॅ ऑडॅ दी टाकीत नॉतॉ गा का..?
पेद्रु : टाकीतोतॉ रॅ.. पन कापॉन नाय, आख्खाशा आख्खा टाकीतोतॉ.
लाद्रू : माआ कय धॅनात आला नाय.
पेद्रु : मॅ जीवनात आख्खा तांबोटा टाकॅसॉ आन जिवान जाला गा ता तांबोटा काडॉन माकून फ्रीज मीनॅ ठवॅसॉ.
लाद्रू : अच्छा, मीनजॅ आज तास तांबोटा तू कापॉन जीवन्यात टाकीला.
पेद्रु : तुला खरा हांगॉ गा, शार दी जालॅ ता तांबोटा मॅ जीवन्यात टाकितॅ. आज पन काडॉन ठोयोतारॅ, पन जाला का, तांबोटा विताळला रॅ.
लाद्रू : तांबोट्या नशीब, बी का ? बरा मसालॉ-बिसालॉ टाकीटा गा नाय तू ?
पेद्रु : ऑडॅ दी टाकीत नॉतॉ पन आज पळीभर टाकीलॅ.
लाद्रू : वा ! मंग खायदा का..
पेद्रु : खासा का ? आमश्या इये बोल्ने खा लागॅत माला.
लाद्रू : क रॅ ?
पेद्रु : आमशी इये सुलीओर जिवान बनवितॅ पन आज मॅ गॅस वर कॅलॅ.
लाद्रू : वाये ! मंग तूआ कय खरा नाय. लवकर घारा जाय आन मॉडकॉ मारॉन, ठाव-बिव सॉळॉन ठो.
पेद्रु : ताहास करतॅ. तू येता जिव्या दो ?
लाद्रू : नाका रे, मागशा टायमाला आहास जिव्या बोलविला आन जीविल्योर ठाव सॉळ्या लावीलॅ तू. मॅ या नाय आन तुई लहनाई भाजी पन खा नाय. आरे हो पन तू हांगीला नाय ता ? पाव किलो लहनाई भाजी केले गा अरद्या किलोइ..
पेद्रु : कुनाला बॉल नाका. आमशी इ गेले नाशिकला गपचूप तीआ कबाड उगड्ला आन शार-पास पाकळ्यो मॅ टोरकाविल्यो. त्याईस भाजी केले.
लाद्रू : शा मारी तुला “लहन्या” कादो हांगात्यात ता आज माला कळला रॅ.