डसकाळलॉ पानी तॅ
माथ्योर हांडॉ पानॅय भरलॅ
वर बगीत साल्ले
लागली पायाला ठेप
मंग भिजला हांगातॅ
मनात विसार डसकाळातॅ
सैरभैर कापरी भरातॅ
झाडाई फांदी वारॅय हालातॅ
पाने फुले खाला पडातॅत
समुद्रा लाटयो वरखाला हॉतॅत
खोल समुद्रात का सल्ले
आयुशात ऑबडॅ कश्ट कॅलॅ
आंगोर सुकदुक झॅललॅ
संवसाराआ जंगलात आख्याये
वायल्या वायल्या झाडोर घरटे
पनू वार्या लहरीत
अॅकमॅकां बरबर हात
मायेशे बोल्ने अहले
यॉस उबदार स्पर्श सल्ले.
- सौ. हेडविजेस रूमाव, गास