आगरा-डाँगराशो कान्यो – ऑल्विन परेरा

आगराडाँगराशो कान्योऑल्विन परेरा, अक्करभाटनानभाट

            बाबूकाका दोनी पॉराई भाटशा राटाव सौदॉ पॅलारशा सय्यद वखारवाळ्याला कॅलतॉ. बाबू ओट्योरशा मेडी मॅरॅ पायोर बॅहॉन बिडी पेत आयकातोतॉ; “आतॅ भाटात मोटर आले, बैल कुन बाळगितॅ? राटोर गावशे पोरे दॉपारा गरय गिथी बाडूक धऱ्या बॅहात्यात नायतॅ पत्ते खॅळात्यात. बी राटा कागुळ्योर शीडी पन घरबॉ कऱ्या ये नाय आतॅ. मंग ठव कदो?..”  बाबूआ लक्ष त्योरसा उडला, तॉ एकशिती जालॉ. बिडी जहीजही बारकी हॉत गेली तॉहॉ बाबूपन त्या बारक्यापनात गॅलॉ.

            पयला महायुद्ध खपता खपता  बॉठ्याबाबा नाव सलव्यादो  फरसूल्या मिंग्यातॅ बाबू जालॉ. बाबू नाव फरशा मिंग्या आन बाबा नाव मिंग्या फरशा. पेपरोर लिईला तॅ कुन कुनाव बाबा ता हांगता यासा नाय पन तरा तहीस होती तॅ बॉठ्याबाबा नाव पुडॅ लॉटला.

            बाळ्टीम कय्रा देवळा फादर ब्रांझ शिल हॉतॉ. कागदोर फ्रान्सिस्को लिवीला तरी फरशाला ‘बाबू’ नाव पडला. त्या जाला का? मिंग्याई पिली १२ वहराई जाली, पिलीआ हयरा जाला! तिगाळा मिंग्यातॅ  अवलद जाली मंजॅस आपलॉ बाबू जालॉ. मिंग्या तेरीतॅ मीन्नॅस एखुंद कय जालता हांगातॅ पन ता मावलीला गॉड जाला. असो, बाबूयॅ नॅलवाड कॉडॅ! बाबूला समज ये ये तव पिलीबाय वराडली. मंग पिलीबायतॅ कय जाला तिगाळा पिलीबायशा हरी फरशाबाबू पन उजारलॉ. लाडकॉ बाबूमामा गनाई! बाबू काईम डोकऱ्या बयदरीस अहाता. डोकऱ्याबयला कापरी लागलोती आतॅ. पान नंदार एकदम साप. आख्खोदी ईंधाळ्यात बॅहाशी. कापरी पायान ती मान हासकीती ऱ्याशी आन बाबू ती पुडॅ बॅहॉन तिआ कानाशो सब्बान वाळ्यो डॉलताना बगीत रेतोतॉ. त्याला त्या वाळ्या किनकिन आवाजाई बोठी गंमत वाट्याशी.

            बाबू १० वहराव जालॉ तिगाळा त्यो वाळ्यो वाजाशो थांबल्यो,डोकरीनॅ डॉळ मिडकीलॅ. वाळ्याई आन माडीओर तूहाशा पराड्यात जा का बयसा ईस्टाल हॉता त्याई लेक्या- ऑआरात वाटनी जाली, मिंग्या आन काका पनू भाटशा वाटनीला बेहेले. काकानॅ राटा मनोर गॅठला, मिंग्यो लानॉ तॅ हा ला हा कॅला आन दॉआई राटा कामाला हात घायलॉ.

            दॅगामावसॉ नावदार मिस्तरी. तॅनॅ बावखालाई देखणी-आखणी केली आन पूहाशा तोंडोर लाकडादो जासॉ ठराव कॅलॉ. तडनॅस हांगातॅ तांड्या बैलबजार पन बगॉन हॉयदॅ आहा एकुंदरीत एवजिला. तांडा मंजॅ आजसा संतोषभूवन. हिंबळोरशी जत्रा खपली, गा नाताळशा हनापासून तांड्योर देशोरशॅ गाठीमाहणे ढोरे विक्या बजार भरव्याशे. मंग तॉ मगा-पुहू खप्यापोत घाटी तडेस ऱ्याशे. होळी नजिक आली गा ढॉरबजार ऊगाळ्यासॉ.

            असो, दॅगामिस्तरी, काका, मिंग्या आन हरोर बाबू आहा कटांबळा निंगाला हॉपारा बंदरोर वखारीत. तिगाळा तुसखाडीपासून रेल्वे कारशेडपोत भल्ली खाडी होती. सादारणी आज विराडा सिगनलपा पटेल टिंबर मार्ट हाय तडे वखार होती आन तडसा लाकूड हाड्यासा.

            कय हागली, कय खैरा ऑहॉ सौदॉ पटवॉन आन जा नाय मिळॅ त्यादो डाँगरा शिवणसई जासा आहा ठरवॉन तिनू गाडे मांगूलवट आले. मिस्तऱ्याई कामाला मोर्त घॅटलॉ. बाबूला जालती जाम होस; तॅत्यान तॉ गॅलॉ दॅगामावशा घारा ऱ्यादो. बाबू एकोक वस्तू घडताना बगितोतॉ.

            बी मॅरॅ काका आन मिंग्या झूपलोते थाट्याए तागॅ, हुंब, बांड्यो याई वॅवस्ता कऱ्यादो. काकानॅ बाबूला हुंब पायाशा मॅठ्यात धरॉन नाकापोत लांब ऑडॉ कुडकॉ पाड्यासॉ, ई एक माप मंजॅ एक ‘घड्डाव’ आनू थाटॅ एकोर एक मंग एकोर तिन अहॅ वाळॉन ‘माळ’ बांद्या हिकविला.

            आखेरीदो बावखाल डॅवॅला गा खॅरॉ काडॉन पानखांबॅ शिळ्यलॅ पात तॅत्यान डाँगरा जासॉ बेत जालॉ. माकून तिन गाडे जमायले. गाड्यायो हाट्यो काडल्यो. बॉठ्ठॅ खांब, घरादो घॉणॅ, वाहॅ, अहॅ लांबॅ बूंद्याए नग वायाशॅ अहलॅ गा मिंगॅ गाड्याई हाटी काड्याशी आन नग लांबॅ लांबॅ अहॅ गाड्यात आथऱ्याशॅ.

            असो, जासॉ दि ठरलॉ. घारा डाँगराई मावटी बो आले पन सवता डाँगरा जासा, का हायदॅ तडे? काहा हायदॅ? बाबू हप्प्य रात निज नाय.

            डाँगरा जासॉ दि उजाडलॉ. दॉपारशे जिवनेखावने जाले, डोख्योरसॉ दि नाख्खॉडॉ दऱ्यालागली गॅलॉ आन मॉताबाबा मोरक्यो, मिनॅ मिंग्यो आन मांगॅ काका, परतेक गाड्यान दोन दोन गव अहे तिन गाडे हाखयले. बाबूदरी कॉथळा धऱ्या दिलता. साउळ, हुक्कॅ बुंबूल, तॅल, वांगा बटाट, मशालॉ अही मावटी जिन्नस. आन बाबूला ता काय बॉठ्ठा ईस्टाल वाटलोता!

            जिवदानी, कनॅर, मांडवी करीत काळोख पडता नावळ पोसली शिवणसईला. बाबू मिंग्याला विसारतॅ, “बाबो आपून पुडॅ पुडॅ साल्ले तॅ लांबशॅ डोंगर पन मांगॅ मांगॅ कहॅ जात्यात?” मिंग्या नुसतॉ हावलॉ.

            गाडे होडले, बैलादो पँडॉ  पाणी जालॉ आन दगड मांडॉन मॉताबाबानॅ सयपाक कॅलॉ. मॉताबाबा हाथाला काय सव! लग्नेमोर्ते अहलेगा तॉस हिजविता. मॅरशा हॅतात वसयशा वाडवळाई गाडे होडलोते. वाडवळादरी बैलाये नाय, भैयशाए गाडे. काकानॅ विसारला तिगाळा एक हांगातॅ, “मुळगावशे

आमी. आमसं देवळां काम सालू करासं हाय तवा अटे घोणे घ्याला आले, बिजे चिंचोटी जंगलात गेल्यात.”  वाडवळ हॉकरॅ का कऱ्याशॅ, झाड काप्यासा परमिट बुडोर मिळ्यासा. एक परमिट मंजॅ एक बुड. मंग यॅ भर जंगलात खिरॉन एका बुडातनॅ दोन बुंदॅ निंगालॅला झाड शॉदॉन काप्याशॅ. मंग ता भयशॅ लावॉन डाँगरा जंगलातनॅ ताळीत न्यासा खाला.

            असो, हाकोवटे वखार उगडली, सौदॉ जालॉ, खांब्याए गाडे झुपले मॉताबाबानॅ बैलाई हॅपाट पिळली. तिगाळा परांडी न्याशी नाय. बैलाला परांडी मारना गुन्हॉ हॉतॉ. पकडला तॅ बैला हॅगाट गाडा गॅला. सादारणी बारा वाज्या गाडे पिरकुंडा आले गा बैल हॉड्याशे. आन बाबू ज्या वाट बगितोतॉ ती मावटी अडेस हिजातॅ ई त्याला हुमजाला. सयपाक वाडीस कॅलॉ. डाँगरा मावटी वाट बगित घारा पोरेटोरे होसयलेले हायद्यात ई जकल्या धॅनात हॉता.

असो, वहरी गॅला आन् बाबूनॅ राट ऊबी रॅता डॉळॅशॅन बगिलॅ.

            उब्बक, साक, वनफळ, जॉहार, आपय, दाबाड्या, पटाळॅ, कागुळा, पानखांबॅ, माळहरॉ, पाडिया, पोंदळ; काय ती सॉबा! पडत्या फॅऱ्यात वहरे भरते रेले. बाबूतॅ बाब्योन् बाबू जालॅ. ज्या नावोरनॅ बाबूआ नाव दिलता तॉ दादा फरसूल्या गॅलॉ, मिंग्याबाबा गॅलॉ, राटा बांदनिए दॅगा मिस्तरी, मॉताबाबा जकले राटा फॅऱ्यात गुडूप जाले पन आश्विन ऊंगवलॉ गा नारायण बॉलतॉ हॉयासॉ- राट करकरतॉ रॅलॉ.

बाबूनॅ विद्या पुडॅ निली. सवता पँड्या-सुली लाकूडादो डाँगरा जा लागलॉ. मावटी हाडीत रॅलॉ.

            आतॅ भाटात खप्या येत्यात ते वारली लोक पन पयरॅ-कोती कय टुकॉन नेत नाय पन तिगाळा एक हावळी कडे पडली गा सरगातनॅ मान्ना पडल्याआंगडा लोक धाव माऱ्यासा.  १९४८ शा दिवाळी नंतरशा वारमोडीनंतर कय झाडपान रॅला नाय. नवॅ रॉपॅ वाड्यापोत तॅ लॉकाय हाल कय घनॅस जालॅ. घरोर मोते टाक्या हावळी नोती. मोते मंजॅ आतॅ पोंदळ टाकीत्यात तह्यो  २ वळल्यो हावळ्यो निऱ्यो करॉन बांद्याशो. घराला सॉबा येतोती.

            तिगाळा सयपाकपाण्यादो सुली आन त्या पायान एक हावळी काडीपन अही कडे पडलेली नंद्र्या पडात नोती. भाटात कोती आन मांडॅऱ्योरनॅ कजे होयाशे बायकाबायकात. कय लोक हेणी पन सोरतोता, मंग दांडात झिवरी पडले हायदॅ तॅ कुन काहा टाकिदॅ? पाहाळ्यादो लाकूड भऱ्यासा. मंग लाकडादो जंगलपट्टी डाँगरात गाडे न्याशे. लाकूड आहासू सगळा भेळशेळ. शिवणसई, वज्रेश्वरीला ‘कुप’ पड्याशे. कुप पडलॅ मिंजॅ लाकूडाव बजार.

            बाबू आतॅ गाड्याव मोरपी जालतॉ तिन अहो गा शार गाडे पन बैल तॉफ्फार पात आहा बाबू हांग्यासॉ. सादारणी दिड- दोन खांडी लाकूड हाटीओर यासा. खांडीला ४०० किलो आसपास वजान. बैल जॉडॅ तॉफ्फार तॉडा लाकूड, पिक घना येता गाड्याला.

            गावड्या मंजॅ आजशा मनवेलपाड्या बाबू आव्यासॉ. लाणीबांदणी जाली तरी पिक तडेस खारीत २-४ मयनॅ उडवा मारॉन ठव्यासा. गावड्यापासून पार आपल्याअडे यॅ तव पाणी भरलॅलॉ अह्यासॉ. गाडा जासा यासा कडनॅ? मंग कॉरास्मॉ लाग्याशा पुडनॅ पिक घारा हाड्यासा.

            तॉफ्फार बैल, कय भई पन अहाता गॉठ्यात मिंगॅ पँडॉ घरसॉ कय पुरॉ पडातॅ गा? परत गाडे हाक्याशे डाँगरा पँड्यादो. पँडॉ वजनान हळखॉ पन वॅप बॉठ्ठॉ मिंगॅ गाड्याई हाटी काडॉन हाटॉ कऱ्यासॉ. गाड्या आहाला डांबऱ्या आन साकावरनॅ माळ्या टाकॉन गाड्या आंगा बार तिन बांबू काडॉन व्याप बॉठ्ठॉ कऱ्यासॉ गा जालॉ हाटॉ. एक बुठ्ठी ५ किलोई हायदॅ, आन् दोन बुठ्ठीऑ एक पँडॉ आहा माप. कय साठ कय ऐशी पँडॉ बैला आयपतीपरमानॅ हाट्योर भऱ्यासॉ. मंग वाट्यात पँडॉ फॉकालॉ पा नाय बघून वरनॅ पाहाटी मंजॅ भेंडीए बारीक  थादॅ जॉक्कॉन शाकाऱ्याशॅ. हाट्या बांबूला दोऊ मॅऱ्याला जक्याशॅ.

            लाकूडा गाडा दुहरॅ दि परत घारा यासा पन पँड्यादो लोक केळठण, खानिवड्या, घोटगाव, ढॅखाळ्यापोत जातोता. घोटगावसा गाडा तिहरॅ दि आन वरईसा गाडा सौत्या दि परत येतोता. बाबूऑ दोसत खानिवड्याऑ. बैलाला पन रस्तॉ मयती जालतॉ. घारा परात येताना कनॅरफाटॉ यॅ यॅ तव दि मावळताला जासॉ. मंग बैल पन गिरळीहांगडॅ पळ्या हुट्याशॅ. त्यांना पन काळोखपड्याशा आदी घारा पॉशाशी उतळी हॉयाशी बोवतेक. बैल जाम हुशार!

बाबूला बैला जाम वॅड. आगुकॉपात बैलाव पारखी. तांड्या बैल बग्या जादो कॉपातला विसारल्याबिगीर कुन गॅलॅ हायदॅ आहा नाय!

            आगुकॉपात मंग बजारात खिरलॉ गा आपून नुसता आयक्यासा बास. “गरॅ कॉपात, यॉ बाळॉ बरॉ दिखातॅ. त्या मॅरॅ तॉ काब्रॉ सॉबॅदॅ, दोआयो वहनाळ्यो बो मजबूत हात. हिंगे पन खोबरे हात हस्साल शा हस्साल. कॉपात कत्तॅपन खोडी पयल्यो बग्याशो ढॉरात. डॉळ्यात तॅस पाय, दात आठ आन सोटकुली मीनॅ पाय. मस्ताकोर एक आन पाठीओर एकूस भॉवरॉ अहलॉ पाय. पाठीओरसॉ भॉवरॉ मांगशा बाजूला अहलॉ गा त्याला बिन हांगत्यात. पाठीओर दोन भॉवरॅ जॅ अहलॅ त्याला कावड्या बॉलत्यात. हॅप्या मॅऱ्याला लव्याशो वेली हायद्यात तॅ तॉ गांड्या गॉम. हॅपाट पयली बग्याशी दवणी हींगा गथीन बारीक आन मागशा पायाशा मुऱ्यापोतूस अह्यापाय. तोकडी हायदॅ तॅ तॉ तानतोड आन मुऱ्या खाला पोत हायदॅ तॅ तॉ बाऱ्यो. बैला गळ्याखालशी वाकळ पात्ताळ पाय, जाड नाका त्योर लव्याशो वेली नाका. डाव्या कानामागॅ वेणी हायदॅ तॅ तॉ गवण मोरु आन उजव्याकानामागॅ वेणी हायदॅ तॅ तॉ गवण धर. कॉपात तुमाला मॅ हांगातॅ, ढॉर पसान कऱ्यासा कय खासा काम नाय. अह्यो खोडी हत्यात बैलाला.”

            असो, आगुकॉपातनॅ पारखॉन घेटलेल्या बऱ्या ३-४ जोड्याई जलमभर बाबूऑ राट वाईलॉ, गाडे ताळले. बंगली

बांदीली त्यादो जिवदानी डाँगराशो काळ्यो तोडी, निळडोंगरीशॅ पांडरॅ दगड, रानोरशी रेती वाईली, सुन्या घाणीला पन जुपलॅ. शेवटीशेवटी एक खैऱ्या बाळ्या डॉबॉ जालॅलॉ रॅलतॉ. तांबडॉ बैल आन त्योरनॅ तांबडॅ पट्टॅ, सॉबातोतॉ गनाई!

डॉबॉ खाटकाला विकीलॉ तिगाळा बाबू लेक डॅवाताना रडात्यात तॉहॉ रडलॉ.

            बिडी खपली, बाबूला जॉराय खाक आली तॉहॉ बाबू उठलॉन तडाक राटोर निंगालॉ. हिवरालागली वालाए टापू,

रवयशॅ माडॅ भॅराटाई वाकळ घॅऑन निजलोते.कांड्योरनॅ सलताना वईओरसॉ खरोदॉ, हजारी खॉलॅ दव्याए निथळातोते. लांबशा वाडीत कुनॅ ईंजान लाईलता त्याव घर्रर्रर्र बारकॉ आवाज होडलॉ तॅ आख्ख्या वाडीत सामसूम हॉता. मिन्नॅस एखाद अंगाट मॉडल्याव, हावळी पडल्याव आवाज. बाबूनॅ मनभरॉन राटा एकएक हांदॉन् हांद्योरनॅ हाथ फिरविलॉ, गॉकॅ घॅटलॅ, राटोरसॉ वास एकदास शातीत भरलॉ. जड डॉळ्याय शेवटसॉ निरोप देताना बोयलॉ, “डाँगरातनॅ आलतॉ, डाँगरा साल्लॉ. हारकॉ जाय.”