संपादकीय

संपादकीय

          सब्बान कुपारी बाहा-बेनींना नाताळश्या हनायो आन नव्या वहारायो ओबड्यो शुभेच्छा.  

          मंडळी, या वहरा २५ जुलैश्या दिहा आपल्या जकल्याव लाडकॉ फादर फ्रान्सिस दिब्रिटो (तात्या फादर) आपल्यातनॅ निंगॉन गेले. फा. दिब्रिटो आपल्या अंकाकरता नेहमी बॅस दिलास पन यॉ अंक ‘एक दस्ताऐवज’ हाय, तुमॅ त्याआ प्रकाशन सालू ठॉवा आहा त्यायी आमाला हांगिलॅ. त्यांशी यी इच्छा आमॅ नक्कीस पुरी करनार. गॅल्या वहरा नाताळश्या हनाआ फक्त पास दी अगोदर एक दू:खायी बातमी आली, ती मंजॅ, आपल्या समाजाव पयलॉ गायक, विजय मच्याडो आपल्याला हॉडॉन गॅलॉ. स्व. फा. दिब्रिटो आन स्व. विजा दा आ जान्यानॅ आपल्या समाजाआ साहित्यिक आन संगीत क्षेत्राऑ कॉपरॉ रिकामी जालॉ.  त्या दॉगांना ‘कादोडी’ आन ‘कुपारी कट्टा’ टिमश्या दरनॅ श्रद्धांजली.

          मंडळी,  नाताळ २०१६ श्या कादोडी संपादकीयामिनॅ मॅ फा. दिब्रिटो मराठी साहित्य संमेलनाऑ अध्यक्ष जालॉ पाय आहा लीविलता, ता स्वप्न सप्टेंबर २०१९ ला पुर्न जाला. आपल्या कुपारी समाजाशॅ पोरे / माहने कलाक्रिडा क्षेत्रात चमक्या लागल्यात, गेल्या वहरा संपादकीयामिनॅ मॅ आपल्या समाजात समाजाला पुडॅ घॅवॉन जायदॅ आहा राजकीय नेतृत्व आहा लीविलता. त्यानंतर आमश्या ‘कुपारी कट्ट्या’ ग्रुपमिनॅ मॅ हांग्यासॉ, आपल्या समाजायी बरी प्रगती सलले, तॅ आपलॉ कुपारी आमदार हॉया पाय, आपलॉ कुन पॉर रणजी / भारताआ टिम करता खेळ्या पाय, कला क्षेत्रात चमक्या पाय. मंडळी, आपल्या गाहासॉ पॉल डिमेलो यांसा आपल्या संस्कृतीओर आधारित चित्रकला प्रदर्शन प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरीत गॅल्यास मयन्यात जाला, पॉल गेली ८-१० वहरे आपल्या या अंकाकरता मुखपृष्ट बनवॉन देतॅ, ता पन कय न घेता, त्याला हांगीला गा, त्याआ नेहमी एकुस वाक्य, तुमॅ आपल्या समाजाकरता ऑडा करत्या, त्यात माऑ खारीऑ वाटॉ, त्याआ खास अबिंनंदन. शिरलयवाडीशे फिलिप डिमेलो सर यांशे चित्रे पन खुब प्रसिद्ध जाल्यात आन ते यात बुजुर्ग हात. आपलॅ इतर बंदव आन बेन्यो पन बर्‍यापैकी चमकाल्यात. आपल्या आडे एकदी या जकल्यांसा एक प्रदर्शन हॉया पाय अही इच्छा हाय.

          मंडळी, आपलॉ कुपारी आमदार कतॅ हॉयॅ माईत नाय पान राजन नाईक आपल्या बाजूश्या सामवेदी समाजाव आपली भाषा बॉलनारॉ स्थानिक आमदार जालॉ, आपले पोरे क्रिकेटमिनॅ पुडॅ जादो पान सुरुवात जाले. झील डिमेलो यी पोरी मुंबई महिला टिममिनॅ खॅळातॅ आन आयुष म्हात्रे यॉ आपलॉ सामवेदी बंदव रणजी खॅळतॉ हाय आन अन्डर-१९ भारताआ टिममिनॅ पान खॅळलॉ. शिरलयवाडीसॉ पॉर, इयान लोपीस खेलो इंडिया बॅडमिंटन स्पर्धेमिनॅ खेळनार हाय. त्यामुळॅ आपुन कडॅस मागॅ रॅनार नाय यायी शाश्वती हाय.

          मंडळी, दर वहरा आपुन कुहन्या तरी गोष्टीओर विसार कर्‍या करता आडॅ विषय घॅत्याव. या वहरा आपुन लग्नाआ कार्यक्रमाओर ध्यान द्या पाय आहा आमाला वाटातॅ, गुरवारपासून लागला तॅ पुडश्या आठवड्याआ मंगळवारपोत आपलॉ कार्यक्रम सुरू आहातॅ. नक्की ऑड्या सेलिब्रेशनशी गरज हाय गा. या कार्यक्रमात हॉनारी सयपाकाइ नासाडी, प्री-वेडिंग रिसप्शनमुळॅ सुकनारॉ अंदाज, त्यामुळॅ हॉनारॉ पैशाऑ नास. यावर आपुन जरा कडाक नंदार टाक्या पाय.

          कादोडी अंकातनॅ आपली भाशा जगवॅकरता प्रयत्न करतॅवुस पन दरवाहरा आपल्या समाजॅआ भलॅकरता एक बरॉ विसार पन देतॅव. एक कुपारी समाज भगून आपुन जकले सोबत रॅवॉन पुडॅ जाऑ.

          बाकी आपल्या समाजायी अहीस चांगली प्रगती हॉत रेवो आन आपली संस्कृती टिकॉन रेवो…