हिंदाळॉ माशी – आलेक्स पिटर डाबरे

हिंदाळॉ माशी – आलेक्स पिटर डाबरे, निर्मळ

ओटोरश्या माशीत,

माडुंल्योर निझवॉन

लेकुराला लाईता लळॉ,

माशी गाइता गाइता ।

वाटीभरॉन दूध गायसा घॅता

गोजिरल्याला पाजीता,

आबोरश्या सांदाला बोलविता

माशीई दोरी तानता तानता ।

माय  मरीयेनॅ  वॅंगॅंत,

जेजू बाळाला धरल्यागत ।

निजविता तान्हुल्याला,  आई माऊली आमची

ई गीत आयकविता,  हिंदाळॉ गाइता गाइता ।

ओट्योरश्या उखळात हडॉन,  रात्याय सावूळ ।

जात्योर दळता दळता,  रमेद  मायसा गीत गाता

हेल, सूर आयकविलॅ लेकुर बाळाला,

थोपटता, निजविता तान्हुल्याला

हिंदोळ्याई दोरी तानता तानता ।

केळीआ खॉल्यात थापीलॉ पीठ,

बनविलॉ पालंगॉ

वांग्याआ कुड्यायॅ सुलीओर

खापरीत भूजीलॉ

शामिनॅ बुडवॉन लेकुराला भरविलॉ ।

शिमटॉ पॉटाला,  माय-बापानॅ घॅटलॉ

अहॅ दी काडॉन पोरांना वाडविला ।

पन्नास-साठ वहरा मागशॅ दी आठविता

डॉळॅ भरॉन येत्यात आज  ।।

गरूडा  पंखाये  तॉ ती गेले उडॉन

साता समुद्रा पार,  साता समुद्रा पार ।

वहरा भरानॅ मायबापाला बोलवितॅ

स मयन्याओ विझा घॅवॉन

PHD  आन M.D. कऱ्यादो

मंजॅ…

पॉराला हांबल्यादो. आन मांडुले धव्यादो.