लाडकी बेन  –  शकुंतला नारायण पाटील

लाडकी बेन  –  शकुंतला नारायण पाटील, नवाळे

लाडक्या बेनीनॅ तॅ तरलॅ

गर्वानॅ कय हरले

तॅइ आपल्याला गृहीत धरले

मान गॅलॉ, दी भरलॅ

इंजान आतॅ, धडधड करतॅ

मशाल पेट्रोल जास्ती भरतॅ

गळो कापीत राश्ट्राअ‍ॅ वादी

कॉडॅ वाटीलॅ, करतॅत यादी

कादो लागल्या यां नादी

आपली मीठ भाकर खाशी सादी

वादी घालतॅत गळॅत गळॅ

फुलातॅत तॅअ‍ॅ ऊहाशॅ मळॅ

आपल्याला इ कय नाय कंळॅ