लाल लुगड्याई हाईल – फ्रँक मिरांडा, उमराळा
आपल्या वसयश्या संस्कृतीऑ शॅहरॉ कोकनी भागापेक्षा वायलॉ हाय. यामांगसा कारन मंजॅ पोर्तुगीज आन नंतर आलॅला इंग्रजा राज्य. पोर्तुगीजांबनॅ आपल्याअडॅ ख्रिश्शन संस्कृतीआ बी पडला. जॅतनॅ नवॉ धर्म आन संस्कृती जन्मा आली. देवळा घाटा आवाजात वाडलेली पिढी, ख्रिस्ती उपास – हन आन संस्कृतीनॅ वसयशी आपली एक वायली ओळख तयार केली. सुरवातीला पोर्तुगीज शैलीत अहलेली ख्रिस्ती संस्कृती हळूहळू एक खास ‘वसयशी शैली’ बनली. ३०-४० वहरा आदी, या वसयश्या घराघरात एक नजारॉ दिखॅसॉस दिखॅसॉ. आंगोर लाल लुगडा, कानात-गळ्यात डागिनॅ (हिरान-बेतीन-वाळयो) घालॉन दापुडॅ बेहेलेली दादी. तीआ तोंडोर वया मुक गाठॉडा ऑथा, पन मनात पराथना. दादी नुसतॉ घराला आधार नोती तॅ ती तॅआ काळश्या श्रद्धेई साक्षीदार ओथी.
मा मामरश्या दादीला गावात ‘लाल लुगड्याई दादी’ भगून ऑळखॅशे. ती जकलॅत लाल लुगड्याहारकी उठॉन दिखॅशी. ती बो बॉलॅशी नाय, पन ती आख्ख्या घरात भरलेली अहॅशी. ती एकटी नोती, पन एकाकी ओथी. तीयो बेंनी, मैतरनी दॅवा घारा गेलत्यो. नातोंडे कायम इंग्लिश बॉलॅशे आन देवळा मिसा आयक्या नाताळ नातॅ लग्नादोस जाशे. ती रॉज हाकोटे चर्चशा रस्त्याला डॉळॅ लाऑन बॅहॅशी. तीइ श्रद्धास्थान देवळा उश्शा मनोरॅत आन घाटा आवाजात ऑथा. पन शरीर तीआ सोबती नॉता. ती पराथना करॅशी, नुसत्या दॅवा करता नाय, तॅ घरश्या जकल्या करतान. तीऑ देव डोख्योर नुस्ती खून नाय काडॅसॉ, तॉ तीआ जीवनात दपलॅलॉ ऑथॉ. उपासात, सेवेत आन जकल्या आयकनॅत. ती धर्म वागनॅत ऑथॉ. कुडा घरात वाडलेली दादी आतॅ मार्बलश्या ठंड्या भीतीत घालवाली. तीऑ नव्याला विरोद नॉतॉ पन सॉताऑ जुनॉ संवसार घालवालॅआ दुख जरुर ऑथा. हिकलेले पोरे तिला जुनाट समजॅशे. तीनॅ जक्ला आयकॉन घॅटला. ती मरनाला घाबरॅशी नाय, ती तॅ तीआ दॅवाइ इच्छा ओथी. पन ती एकटी रॅदो घाबरॅशी. मरना आदी ती नायटीत रेली. तीआ लाल लुगडा कबाडात दूनॉन ठोईल्ता. कतॅ-कतॅ ती ता लाल लुगडा दापुडॅ हुकात टाकॅशी. तॅआ लुगड्यात तीऑ जीव, तीऑ देव, तीआ जग जक्ला हाय. एक अहॉस दि उजाडलॉ, पन तीआ जीवनात कायमसॉ काळोक पडलॉ. तोंडोर हावा आन बाजूला तीआ लाल लुगडा. तीआ आंग ठंडा पडला. डॉळॅ बन जालॅ, हालसाल थांबली, पन तीऑ विश्वास कायम रॅलॉ.
आज आपल्यो लाल लुगड्यायो दादयो नहल्यो तरी जुन्या घरा ओट्योर, हिंदाळया झुळुकीत आन देवळाऑ घाट वाजलो गा त्यो अहल्याव भास ऑथे. ऑ वारसॉ नुसतॉ पॉशाखात नहातॅ, तॉ आपल्या मनात, वागनॅत आन पराथनेत आहातॅ. जॉ कुनाला आयक्या ये नाय पन पन तॉ आहातॅ.