भंगारात विकिलेल्या घराइ कानी – सॅबी परेरा
खिळखिळ्या जालॅल्या एमएटी वरनॅ
भंगारवाळॉ उतारलॉ
जुन्या घरा ओट्योर सडलॉ
तोडीआ अन ईटीआ मिनसॉ सुनॉ खडवॉन बगिलॉ
मेडीला लात मारॉन मजबुती बगिली
दारे-खिडक्यो उगडॉन-मिडकॉन बगिल्यो
बांबूए ढॉसलॉन, रिपारी अन कौले बगिले
माळॉ, जिनॉ, कबाडे, खाट-पलंग, बोरिंग
एकेक जिन्नस बगित गॅलॉ
हातशा सोपडीत लिवीत गेलॉ
मंग आमसॉ बाबा अन भंगारवाळॉ
आमशा बंगल्या हॉलमिनॅ बॅहॅलॅ
शा पेता-पेता लाकूडाव, लॉखांडाव, दगडाव
वॅगवॅगळॉ भाव जालॉ, घासाघीस जाली, सौदॉ ठरलॉ
लिवान-टीपान जाला, बयानॉ घॅवॉन जालॉ
आठ दिहात घराव गठठॉ, मॉकळॉ कऱ्यासॉ ठराव जालॉ
मॅ लिवान-टीपाना कागात टुकॉन बगीला.
तोडीऑ अन ईटीऑ भाव लिवीलॅ पन . . .
त्यावर पॉराई पेन्शीलीनॅ लिविलॅल्या अक्षराव भाव का?
भितीशा बांडीत ठविलॅल्या खॅळण्याव भाव का?
कॉनाडात लिकविलॅल्या खान्याव भाव का?
ओहरीत डकविलॅल्या मावलीआ फुटूऑ भाव का?
दापुडशा मेडीऑ भाव लिवीलॅ पन . . .
त्यामॅरॅ पोरे कुकाबास खेळले त्या आनंदाव भाव का?
पांथाऱ्योर बॅहॉन कॅलॅल्या सुखदुःखा वार्त्याव भाव का?
मेडीओर डकविलॅल्या आहरीत बगॉन बय हॅतॉ पाड्याशी
माळ भरॉन आहरीपुडॅ मानावणाऱ्या बयशा सुखाव भाव का?
दारा-खिडक्याव भाव लिवीलॅ पन . . .
खिडकीतनॅ दिल्या-घॅटल्या धान-कालवानाव भाव का?
खिडकीतनॅ जालेल्या, अन हॉता हॉता रॅलॅल्या हयऱ्याव भाव का?
दाराखॉपा रडात-रडात काढलॅल्या रातीऑ भाव का?
दादा लग्नासा तॉरान हुकलॅ तरी दारालास हाय
त्या आंबोत्यॉ खडलॅल्या तॉरनाव भाव का?
कबाडे, पेटी, अन पेटुल्याव भाव लिवीलॅ पन . . .
पेटुल्याशा तांबड्या लुगड्या वासाव भाव का?
खाटयॉरशा वाकळीआ उबॅऑ भाव का?
एकास ओहरीत दोन जॉडप्यांना एकांत दॅणाऱ्या
पॉपडॅ निंगालॅल्या कारवीआ कुडाव भाव का?
रिपारी अन कौलाव भाव लिवीलॅ पन . . .
कौलातनॅ यॅनाऱ्या निंबरा तिऱ्याव भाव का?
डॉळ्याशॅ आहूं काडनाऱ्या गइशा धॉराव भाव का?
हारविलॅल्या जमिनीवर काडलॅल्या कनीऑ भाव का?
घरशा ढॉराए बाळंतपने करनाऱ्या गव्हानीऑ भाव का?
हिंदाळ्याव अन माशीऑ भाव लिवीलॅ पन . . .
माशीआ खालनॅ-वरनॅ यॅनाऱ्या गार वाऱ्याव भाव का?
हिंदाळ्यात गावॉन निज्याशा सुखाव भाव का?
लग्नादो हिंदाळ्यात बोयलॅल्या गान्याव भाव का?
बय मेली तिगाळा डेवरलॅल्या हिंदाळ्या दुःखाव भाव का?
मान्य हाय, घर जुना जालता
छप्पार गळातोता, जमिनीला ऑल येतोता
भीतीला, कुडाला पॉपडॅ आलतॅ
मेडीला, बालाला विवळी लागलोती
पण . . .
ज्यानॅ निंबरात हाईल दिली
पाहाळ्यात ऑळॉ दिलॉ
थंडीत उब दिली
त्या घरा, घरपनाव भाव का?