पुना भॅटॅदा गा–विजु वाझ

पुना भॅटॅदा गा विजु वाझ, दारसेंग

कुनाऑ कुन गॅलॉ ?

कुनाई बेन, कुनाऑ भाआ, कुनाई आय, कुनाऑ बाप, कुनाऑ जावाय, कुनाऑ कुण्यात तर कुनाई भावजय.   अ‍ॅका वादळानॅ सत्योनाश कॅलॉ. आयमेरीऑ घाट जालॉ गा मम्मी पप्पा येदयात मनुन वाटयात डॉळॅ घालॉन वाट बगीत्यात बारके. रातशॅ निजव्या लाविल्यात तरु आयबाप कडे हात ? मनुन विसारत्यात लेकरे. दादे मॅ बाळत हॉताना, माला निज लागली तर माला ऊठविदा गा ? आला माआ बाये मॅ तुला नाय ऊठव्या तु आखॉ गाव ऊठवॅ. तीस लेक निंगॉन गेले तॅआ वाटयौर वाट बगीतॅ आय.

कामोरनॅ अ‍ॅऑन पायाशे बुट काडताना हाताशी बॅग आनी फळाई पिशवी बाबाआ हातात दिल्योर छाती फुगवॉन पोरोर बघणारॉ तॉ बाप. लग्नाआ कार्यात कुहन्याई अडसनीत कुन्यात हाय ना ? मनुन पॉटभरॉन आपल्या कुन्यातशी वाहवा करणारॉ हाळॉ कुन्यातला शोदीतॅ. जरशी कय दुखला खुपला कय गरज लागली तॅ आपल्या ताईआ घारा धावणारॉ बंधव.

दादीबाबा हॉडॉन गॅलॅ पन माआ भाआला न कळता कडशी तळणाआ रोटयाई, करजाई, हिंगोळीई वाटनी आली गा पदरात निकवॉन माआ हातात कॉंबनारी माई वयनी. शेवटी सुखदुखात आजारात देवळात हपथ घॅवॉन आंगठी घालॉन अ‍ॅकमॅकाला शेवट पोत साथ दयाशी आहा हांगनारी जोडी पान तोडली……..

दि भरातॅ रात खादो  येतॅ . एक उहिंऔर मॅ डॉखा टेकीतॅ बीई ऊंही रिकामी. मिनॅ निजनारा माआ लेकरु माआ वॅंग्यात येताना हात बाजुला टाकीतॅ. रिकामी गादी बगॉन ता माआ वॅंग्यात घुसातॅ. हिंदाळ्यात बॅहॉन बापा लक्ष वेहीओर, उताऱ्यात ऊबी रेल्येला आयशी नंदार वेहीओर, खिडकितनॅ त्याई / तिई नजार वेहिओर आनू आंगळ्यात खॅळनाऱ्या पॉराई नंदार वेहिओर……..

एकुस पुना भॅटॅदा गा…….