बदलती सृष्टी, आमशी द्रुष्टी – जोज्या तुसकान

बदलती सृष्टी, आमशी द्रुष्टी – जोज्या तुसकान, गाहा

करॅ पासू काका, समदा बदालला बग !

         आपलॉ समाज पार बदलॉन गॅलॉ बग. आतॅ समाज्यात पैसॉ आलॅ. एकेक गाडयो का, आंगळ्यात शार शार गाडयो का, कय विसरॉस नाका. आतॅ तुआस बग ना, तु आंगोर, डाग पडलेले शड्डी-गंजीफ्राक घालॉन लॉकाआ वाडीशॅ (सॉरॉन) खॉलॅ काप्यासॉ आन मुंबय घॅऑन जासॉ. (त्योरनेस नाय गा, मॅ ‘वाय दिस खोल्यावरी.. खोल्यावरी.. ऑ गानॉ लीविलतॉ, आठवातॅ गा) आतॅ तुऑ रुबाब का बगॅसॉ. डोख्योर पांडी टोपी का, (अद्न्ये मद्न्ये आपल्या पॉराई कॅलॅल्या कार्यक्रमात तु, लाल-तांबडी टोपी घालॉन मिरवाता, ता वायला) इस्तरीआ कामिज आन घडी न मॉडलॅला पोन्या. बापा… बापा… करॅ, का सॉबाता तु. भगुनुस हांगातॅ, जक्ला बदालला बग.

         पान मॅ का हांगातॅ, अ‍ॅ हॅताभाटात बांदीलॅलॅ बॉठ्ठॅ बॉठ्ठॅ बंगलॅ आज ओशिक पडलॅलॅ दिखातॅत. करॅ पासूकाका, एकतर या बंगल्यात कुनुस नाहातॅ कारान पोरेबाळे हिकॉन बार नोकरीला जात्यात आन मंग तडेस रॅत्यात. डोकरे दादी-बाबा आहातॅत-नाहातॅत. आन जडे कुटुंबे हात, तडे बय-बाबाई सोय जिन्याखाला केलेली आहातॅ. बिशारे पोरेपारे कामदंद्यात ओबडे गुतलेले आहातॅत गा घर बांदताना आपल्या डॉकर्‍या बय-बाबाला वायली खोली काड्यादो भाहॉन जात्यात बग, का करॅसा ?

         पयले आपले कुटूमे नोकरी आन हेतीओर सलॅशे. आतॅ आपले पोरे वॅगवॅगळ्या दंध्यात पडल्यात. बिल्डिंग लाइनमीनॅ कॉडॅ जन पूडॅ आल्यात. कॅटरिंग मीनॅ पन आपलॅ तरून पूडॅ हात, तॅ आपल्या लॉकाआ तॉंडाय सव पुरवीतॅत. तॅंन्ना सवीआ शायनीज-फायनीज खा घालतॅत. पान पासूकाका, माला आहा वाटातॅ गा आपल्या पॉरांइ खान्या-पेन्योर लक्ष दिला पाय. या लान्या-लान्या पॉरांये पोटे पूडॅ आलेले बगिले गा बरा नाय वाटॅ. लानपनी औश्येदाऑडा खाला ना, मंग भॉटेपनी जिव्याओडे ऑखांदे खा नाय लागात, इ ते हुमजॉन नाय घॅत. करॅ, आपल्या वखतासा ता तिखाट हुक्क्या बुंबला जिवान, डोंगरशी मावटी, वाला गॉळॅइ भाजी नुसता नाव काडला तरी तॉंडाला पानी हुटातॅ. आतॅय पोरे तॅला ‘बुलशीट’ बॉलातॅत आन रस्त्योरसा पॉट फूटॅ पोत खातॅत. का करॅसा हांगू ?

         तहे आपले पोरे हिकॉन बॅताम पूडॅ गेल्यात, इ बाकी खरा हा. जगाशा जकल्या देशात आपले पोरे काम करत्यात बग. अडे जे हात ते पन कय कमी नात. परतेक गावागावात हीरॅमानकॅ हात. आपले पोरे खॅळात पूडॅ हात. कलावंत कॉडॅ हात. समाजसेवा करॅदो पन पूडॅ हात. लेखक-कवी तॅ वीसरॉस नाका. गर्दीत दगड मारलॉ आन जॅला लागलॉ तॅला विसारला तॅ, तॉ नातॅ ती हांगेदॅ ‘मॅ लिवीतॅ’. करॅ, तुला माइती हायदॅसू, पैसॉ बक्काळ जाल्यानॅ आपला लोक बार इजरायला तीर्थयात्रेला जातॅत. यात्रा पवित्रभूमीइ करतॅत आन ‘तीर्थ’ मात्र ड्यूटी फ्री मीनसा घॅत्यात. आतॅ विकास बोयलॉ मीनजॅ तॉ अहॉ पन हॉतॅ बग.  

आहा पन एक जॉड्पा

         डॉकरॉ- डोकरी बंगलॅआ व्हरांडॅत भेलते आन वार्ता करतोते. मॅ रस्त्योरनॅस हाळी दिली तॅ माला आतलॅंगास बोलविला. आला-अळशी घायलॅलॉ गरमागराम शा दिलॉ. तॅये दोनू पॉर बार हात. पोरीआ लगीन हॉवॉन ती हार्‍या गेलती. दोगे एकटेशे एकटे पडलॅत.

         तॅंना बरा वाटला पाय भगून मॅ बोयलॉ, ‘काको-काकय आतॅ टाइम बदालला. ऑडॉ भॉठॉ बंगलॉ, पोरे-बाळे पन तुमी एकटे पडल्या. बरा नाय वाटॅ.’

         ‘ताहा कय नाय,’ काका बोयलॉ. ‘आमी दोगी एकदम सुशेगात हाव. पॉरा-बाळाई रगाजळ नाय. हाकोटे देवळा जात्याव. हांशी आयमेरी रोजरी करत्याव. पाय तिगाळा उठातॅव. पाय तिगाळा निजातॅव. नाटक-पिच्चर बगीतॅव दोगी लागॉन सयपाक करत्याव आन कंटाळॉ आलॉ गा बार जाऑन जिवीतॅव. काकयनॅ हावॉनूस काकाला सात दिली. हांगातॅ, ’पोरेबाळे तडे सुकी हात ना, मंग जाला ! बी का पाय आपलॅला. काकाआ पेन्शन येतॅ त्योर आमसा मस्त भागातॅ. काकाऑ फंड आलतॉ तॉ बॅंकेत ठविलॅ त्योर व्याज येतॅ ता वॅगळा. पॉरा या डॉकारपनात अजून बी कुहना सुक पाय आमाला.?’

         मॅ दॉगांना नमस्कार करॉन निंगालॉ.   

आमशा सोरगीय बापा

         परमीशर बापा, तूआ राज्य जकल्या दुनियेत पसरॉ. तू जरी सर्गात रॅत अहलॉ तरी तू आमसॉ जकल्यात भॉठॉ बाप हा. कुटुंबात बाबा आहातॅ. तहॉस तू जगासॉ वडील माहनू , नाय गा. सर्गात तूऑ जहॉ शांतीऑ कारबार सलातॅ, तॉहॉस तूये अजान लेकरे रॅतॅत तॅआ पृथ्वीओर पन सलोंदे. तॅआबनी तू आमाला सुबुद्धी दे. सॉरगाहारकी परिस्थिति आमशा पृथ्वीओर आली तॅ

आमशा जकल्या जाम बरा हॉयदॅ. आमी जकले सुशेगात रॅनॅव.

         परमेसरा, आमाला पॉटापान्या पुरता मिळाला गा बास जाला. आमाला जास्ती हाव नाईस. मर मर मरॅसा आन ऑबडा जमवॉन ठवॅसा, तॅव का ऊपेगु ? शेवटी शरीर मातीतुस जासा ना ! तॅआबनी अडेस जरा मजेत दी घालवीलॅलॅ तॅ का वाईटू.?

         तुआ पॉराला माहना रूपात , तु अडे धाड्लोता आन आमाला ‘प्रेम-दया-शांती’ ऑ संदेस दॅऑन तॅनॅ जग्यादो हांगीला. आमी आमशा सुकलॅल्या (जुन्या विसाराआ) आयबापांना, रागा-रागी करनार्‍या नवर्‍याला नातॅ बायकूला, बिगाडलॅल्या पॉरांना, जळनार्‍या नातॅवाईकांना, बदनामी करनार्‍या

        मित्रमंडळींना, भागाऑ कांडॉ फोडलेल्या मॅरदॅरशांना पयली शमा केली पाय. मंगूस तु आमाला शमा करदा, आहा प्रभू येसु ख्रिस्त हिकवॉन गॅलॉ. तॅइ ई हिकवन रॉजशा रॉज पाळॅदो आमाला ताकत आन प्रेरना दे. कारन वैर्‍याला शमा करॅशी मीनजॅ खासा काम थॉडास हाय.

         प्रभूनॅ आमाला ई पन हांगीलॅ गा मोह जाम वाईट. तॉ कतॅही सैतानाहारकॉ आपल्या पूडॅ येतॅ आन आपल्या सांगल्या जगन्याई वाट लाईतॅ. मॉहाशे रुपे तरी कोडे.? पैसॉ, बंगलॉ, जमीनजुमला, गाडयो, माहाना सॉबना ऑडास का मोबाईल फोन आन लायकी नसताना वरशी जागा. अहयो बेताम गोष्टी हात, जॅआपासून तु आमाला लाम ठो. आमाला वक्तोर सावद कर आन आदार दे. तॅतनॅस आमशी वायटापासून हुटका हॉयदॅ बग.

         परमेशरा ई जक्ला आहास घडॉन दे. तथास्तु.!