मरसू दादय — बावतीस पेडीकर, नंदाखाल.
अर्नाळा आगाय तॅ नाळा निर्मळ यामिनॅ आमसा उंबरगोठन नाका हाय, तडे हनुमान मंदिर हाय, जडे दर वहरा आपल्या पवित्र आठोड्यात गुड फ्रायडेआ मागॅ पुडॅ हनुमान जयंती जत्रा भरातॅ. आमी जकले तॅआ जत्रेला जाशे, सनॅ कुरमुरे डाळ खजूर खादो आन हुआसॉ रस प्यादो. तॅआ जत्रेमिनॅ बी खूब खादो प्यादो आन खेळने तन खूब अहॅशे.
मॅ आमशा गावशा फरश्याहरी जासॉ, फरश्या नाना एकदम सज्जन माहनू, पापभीरु. आमशा मॅरदॅरशा पंदरा-वीस गावात जकल्यात भॉठा घर फरश्याआ पन तॅआ वाट्याला एक लानी ओहरी आल्ती, ओहरीला आनखीन लानी ओहरी. तॅआ दोन भाहाशा मिनॅ कारवी कुड. तडेस सूल, पानी ठॉअॅदो लाकुडाई पालतेरी. रातसा जीवान जाला भांडे कुंडे साफ जाले गा तॅआस जागेओर निजादो सोय करॅशी.
फरश्या काका म्हंजे जकले तॅला नाना हाक माऱ्याशे. तॅइ बायकु मरसु दादय, जकल्या गावाशी मरसू दादय. आख्ख्या भॉठ्या घरात ८०-९० जन रेतोते, दुमा शेट कारभारी. तॅआ दरी खूब जागा जमीन होती. दुदाव धंदॉ हॉतॉ. तॅआ गॉठ्यात पास स भैयी होत्यो. दोन कनगॅ घरसा भात हॉता. त्यादरी बैलाइ जोडी होती. गाडा हटॉ, गाडली पन होती. आगाय पासून गाहा भिगाव पोत जादो यादो ते गाडली वापर्याशे. त्यादरी खूब केळीइ जागा होती. राटाला बैल जुफॉन तॉ पानी केळी जागेत न्यासॉ. केळी, पपई, भाजी, सवळी, मेथी, वांगे, मिरशी, हळद, आळू खूब कय कऱ्याशे. गावड्या पॅंडॉ गवत, नाय ते सुली लाकूड, किटॉ हाडयाशे. त्याकरता नाना त्याबरबर जासॉ.
दुमाशेट मनानॅ भॉळॉ हॉतॉ. कुना अड परसंगाला मदत कऱ्यासॉ. तॅआ बैला जोडी, नांगरणी, चिखल, आवनी कापनी, मळनी करॅदो, गिरनीत भात दळॅदो तॉ कतॅ नाय बॉल्यासॉ नाय. ऑबडा भॉठा घर, ओट्योर दोन हींदाळॅ, दोन माश्यो, दोन उखळी आन मिनेमास एक पॉलिश दगड, पापड कुट्यादो. घरात भित नोतीस. दोन मेडीला हुंबाई दोरी बांदॉन, त्योर
जुना लुगडा नातॅ पोन्या टाकॉन खोली कऱ्याशी. आज फरश्या नाना आन मरसू दादय ऐंशी पुडॅ गेल्यात. आज तॅंओ रुबाब बगीलॉ गा वाटातॅ कय वहरा पुडनॅ याइ परिस्थीती कही होती.
अॅका भॉठ्या घरात एक लानी ओहरी, तॅत ये नवराबायकू, तीन पोऱ्यो आन दोन पॉर. कितीतरी वहरे त्यामिनॅ रेले, का खाला का पिला, कहे निजले उठले, काहा जीवन जगले, योर चिंतन कॅला पाय.
मरसुदादय, एकदम भोळी भाबडी. तिला कतॅ रिकामा भॅव्यासा नाय. ती कय ना कय करतीस रॅशी. तीस-शाळीस वहरा पुडनॅ, मंडप डेकोरेटर, केटरर्स, कयीस नॉता. गावाशे लोक याशे आन मांडव घाल्याशे, त्याकरता हावळ्यो लगाश्यो. मरसू दादयला हांगीला गा ती हावळ्यो विनॉन ठव्याशी. कारवी भारॉ घॅऑन ठव्यशी. सयपाक मटन करॅदो मशाद तडसॉ धोंडू काका यासॉ. मंग मरसुदादय लहन हॉकलॉन द्याशी, मटन कापॉन धऑन द्याशी, बटाटे काप्याशे, जक्ला ती मदत करॅशी पन मटन सूप प्यादो बी कुन तरी. तिला कून द्यासा नाय. पन तिला तॅआ कय वाटॅसा पन नाय. मरसू दादय दरी खूब कला होत्यो. नाळाहीरा काडॉन दॉदाल रॅवाळा करॅशी. खापच्यो, सॉमट्यो करॅशी,
वाला गॉळॅत वांगे बटाटे घालॉन त्यामीनॅ हाकर घालॅशी मंग का भाजी लागॅशी. सावळा पिठात गॉड घालॉन पानगॉ करॅशी. रातसा धान, नायतॅ कुनॅ दिलॅ हायदे ता धान हळद मसालॉ मीठ घालॉन फोडनीओर गरमागरम करॉन द्याशी. गावात कुना घारा पॅठ, आहुरॉ करॅसॉ हायदॅ तॅ पयला वारना मरसू दादय. करज्यो, हिंगळ्यो, नातॅ वडॅ रोट्यो, ती जकल्या कामात वस्ताद होती. त्यापायान तिला आन तीआ पॉरांना जकल्यो वस्तू खा मिळॅश्यो. जुन्या काळात पलंग तन कय नॉता. लाकुडाई खाट, शारपायी, मंग तॅला हुंब लागॅसा.
मरसू दादय नाळाये हाले कुटॉन बावखलात भिजात घालॅशी, मंग ते हाले कुटॉन काथॉ तयार करॅशी आन हूंब बनवॅशी, नाळा हावळ्यायो काड्यो काडॉन हालतॅ तयार करॅशी. हुंबाला जक आलॉ पाय भगुन नाना ला हांगॉन खुटे करॉन हाड्या हांग्याशी. तॅआ दॉगा दरी खूब कला होत्यो. फरशा नानाला तीन पोऱ्यों आन दोन पॉर.
मरसू दादय रॉज खपती न खापती. आखो दी काम करॅशी. बाळती वेदना कते हॉयाशो आन भॉठ्या घरशी मरिबय कतॅ याशी, ती हुईन सुईन होती, हाकोबोटे बायीओर बातमी, मरसू बाळत जाली आन् पोरी जाली, पॉर जाला, जक्ला घरात आन तासुदा काळोखात, मरी बय ततॅआ कामात एकदम एक्स्पर्ट होती. शाली, वेरॉन,लीला, इनुस आन मिंगेल. पास पॉराये बाळंतपन घरास जाले. त्या काळात कॉन्व्हेन्ट मीनॅ बेबी शिश्टर फुकाट बाळतपन करॅशी. पन मरसू जक्ला घारा. देव नेहमी तॅआ पाठीशी अहॅसॉ.
तॅंई परिस्थिती बगॉन शिश्टर लिओबा नॅ मदर हेमाला हांगॉन तॅइ एक लानी पोरी लीला, कॉन्व्हेन्ट मीनॅ निली. तीआ खाना पॅना कपडेलत्ते, रॅसा जक्ला शिश्टरनॅ कॅला. संत जेमशा शाळीत ती मॅट्रिक जाली. बनारसला गेली शिश्टर जाली.
मरसू दादय आन फरश्या नाना गरीब होते, खूब कष्ट करॅशे, पन पॉरांना शाळीत धाड्याशे, वाझ फादर, भंडारी फादर तॅना फी माफ करॅशे, शाली मॅट्रिक जाली आन झेड पी शाळीत मास्तरन जाली. आगायशा पिटर बरबर तीआ लगीन जाला, ताहास वॅरॉन बी कॉम जाली आन ती कॅथोलिक बँकेत नोकरी करतॅ, तडेस तीइ ओळख गाहासॉ जॉन बरबर जाली. दॉगा लगीन जाला आन ते जकले आज सुखात हात.
पॉर इनुस मॅट्रिक नापास जालॉ मंग बोईसरला अॅका कंपनीत कामाला लागलॉ, तॉडॉस हाथ भार्, ईनुससा वय जाला. पन शाली, वॅरॉन दॉगाय लग्ने, बाळंतपन तॅआ पायान ऑबाडा कर्ज जालता. शेवटी अॅपातॅपा मांगॉन एकदासॉ इनुस वराडलॉ. आन मिगेल, शाळीमिनॅ जकल्यात मागॅ, पन खटपटी लटपटी करॅदो जकल्यात पुडॅ. तॉ जेमतेम दहावी पास जालॉ. कूनॅतरी हांगीला आन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स कॅलॉ आन अॅका शिपिंग कंपनीत नोकरी शोदीताना थॉडॅ पैशॅ पावोतॅ तॅ तॅआ गावश्या अन्नानॅ दिलॅ. तॉ बोटीओर गॅलॉ.
सात आठ ट्रीप जाल्यो, हातात खूब पैसॉ आलॉ. मिंगेलनॅ पयला जक्ला कर्ज फेडला, मंगुस लगीन जॉरात कॅला. मंग रस्त्याला लागॉन सात गुंठॅ जागा होती. ती नाना वाट्याला आलेली तडॅ घर बांदयाकरता खटपट सुरू जाली. पन नाना-दादय नॅ मिंगेलला हांगिला की तू इनूसला वॅगळा टाकॉ नाका. मिंगेल त्यापेक्षा भारी निगालॉ. बायकुला न
जुमानता तॅआ कुटुंबाश्या जाग्योर दोन बंगलॅ बांदीलॅ. एक इनुस करता आन एक मिंगेल करता. दोन बंगल्यात नाना दादय करता स्पेशल खोल्यो, तॅत जक्लि सोय.
अॅका बंगल्या आशीर्वाद फादर अँड्र्यू आन फित नानाने कापिली तर दूहऱ्या बंगल्या आशीर्वाद फादर सालोमन आणि फित मरसू दादय हस्ते कापीली. मिंगेलनॅ नानादादयला काश्मीरला, दिल्ली, कलकत्ता मैसूर, बंगलोर, उटी फिरॅ निला, शिश्टर लीला दरी बिहार बनारस ऑबड्या वॅळा नॅऑन हाडला. विमानात बॅहॉन युरोप, रोम पॅरिस, ताहास सिंगापूर, मलेशिया, इस्त्रायल नॅऑन हाडला. दर तीन वहरा ते वेलांकनीला जात्यात. तासुद्धा विमानानॅ.
एकदम परिस्थिती बदलली, शिश्टर लीला बिहारला रांची प्रोविंशियाल जाले. फरश्या नानाला नवटाक दारू मिळात नोती, मंग कुना कय काम करॅसा आन मंग नवटाक पावशेर प्याशी.
आज फरश्या नाना दोनू घारा तॅला रेड लेबल, ब्लॅक लेबल, सिवास स्कॉच व्हिस्की प्यादो मिळातॅ. मरसू दादय, जुने लुगडे नॅहॅशी. आज तीआ कबाडात शार पास डजान साड्यो हात. आज तीआ दरी का नाय. फक्त तीआ दोन मांडीआ ऑपरेशन जालॅ पन बी कय त्रास नाय.
फरश्या नाना आन मरसू दादय रॉज देवळा जात्यात. ते अजून जुन्यो आठोनी बाहाले नाय. कुनालाही ते रिकाम्या हातानॅ परत धाडीत नाय. फादर शिश्टरला खूब देत्यात. मिंगेल दरी आन ईनूस दरी एकेक भोठी मोटर सायकल आन स्कूटर हायुस. पन परवा दिहा मिंगेल सॉ पन्नासवॉ वाड दि हॉतॉ, जाम बोठी पार्टी जाली. मिंगेलनॅ दोन कार, एक तॅआ करता आन एक इनूस करता हाडल्यो. जकले विसारात पडले. तॅनॅ विराडा-नाळाहॉपारा दुकाने घेटल्यात, वाडा, बोईसरला जागा-जमीन पन घेटले अहि बातमी पन हाय. काय ही हिकवन आन संस्कार. ते नेहमी फादर शिश्टर शे नावे घेत्यात. देवाशी ईच्छा हायदे तर तो कयी करू शकातॅ..
जकल्यांना नाताळ हनायो खुब खूब शुभेछा.