माटुंग्या गेलो रे! –- आयवन क्रास्टो, उमराळा
माआ जीबेओर एक दोन सव जरा घनॅस हात. कडे जाऑन खासा हांगीला गा माआ जिबेला शार पाय फुटात्यात. माटुंग्याशा रामा नायकशा श्री- कृष्णा बोर्डिंगशा केळीआ पानोरशी पंगत बऱ्यास दिहापासून माआ मनामिने मांडे मोडतोती. पन घारा हांग्या गॅला गा टांग्या गॅला, भगून मॅ मूग गिळॉन भॅलतॉ. तुला खासास पडलॅ, ई आयक्यापेक्षा मूग गिळलॅलॅ कय वाईट नाय!
पन योग जुळॉन आलॉ. आमशा मंडळीआस कय काम तडे निंगाला, अन् आमे माटुंग्याला पोसले. जा किडूक मिडूक काम हॉता ता कय जाला नाय, जिव्यासा टाइम जालता. मॅ इला सुशविला अडे एक खानावळ हाय. तुला सलदे गा! सलदॅ. शोदीत शोदीत निगाले.
रामा नायक शा बिल्डिंगशा पुडॅ पोसले. पयल्या माळयोर हाय! कय हरकत नाय! पायरीओर सड्या सूरवात केली आन माई भूक कॉकल्या लागली. भूक लागली गा माला कईस सुशॅ नाय. कॉरिडोरमीनॅ दोन शार महाने ऊबी होते. माला वाटला, आतॅ जाला, अडे गर्दी हाय ! आन आपलॉ नंबर यादो वखत लागॅ. आमे लाईन मिनॅ उबी रेले तॅ आमशा पुडसॉ पॅपरामिनॅ खिरलॉतॉ. ऑ फुकटसॉ पेपर रामा नायक नॅ ज्याई भूक जाम कॉकलातॅ तॅना सबुर कऱ्यादो ठोईले आहा माला वाटला. मॅ पन डॉळॅ त्या पॅपरात घुसव्यासॉ प्रयत्न कॅलॉ, पन जॅनॅ तॉ धरलॉतॉ, तॉ माला कय वासॉन दे नाय. मंग का कऱ्यासा?
अडे तडे बगीला आन सरळ तॅआ महानाला विसारला, क्या आप रांग मे हो? तॅनॅ, मावर आहा कय बगीला ना की जनू मॅ मांडवात अयेरा पाकीट न घॅता जिव्यादो आलॅ. ‘नही, मैं कतार मे नही हू. अखबार पढने आया हू.’ च्यामारी, खानावळीत कुन पेपर वाश्याआ जातेआ. पन जही माला खाशी भूक लागले तही तॅला शब्दाई भूक लागले हायदे. आपल्यातॅ का करॅ? म्हंजॅ लाईन नाय. आमे आतमीनॅ घुसले. ऑड्यात, तॉ नायकूस बवतेक, काऊंटर वर भॅलतॉ. आमाला बगिला आन तॅनॅ सरळ हात धॉया हांगीलॅ.. अरे, ई का फालतूगिरी हाय.
हात धॉन आतॅपोत फक्त अॅकास महाना भला जालॅ, तॉ मींजॅ पोंती पिलात… तरीपन वाद नाका भगुन आमे हात धॉऑन आले. कुपन घॅतला, आन हांगिलेल्या टेबलोर जावॉन भेले.
बारकासा, दोन जन भॅदयात ऑडास टेबल.. का कऱ्यासा रॅ यांना? जरा भॉटा घॅतलॉसा तॅ का जालोसा? तॅआ टेबलोर दोन केळीए पाने आन दोन दोन वाट्यो मांडॉन ठूईलत्यो. पानोर बगीला, वाट्योर बगिला आन मंग मंडीळीओर बगिला, एक मस्त स्माइल दिला.. पॉसलॉ अॅकदासॉ अडे.. आतॅ मॅ आन रामा नायक. हॉवॉन जाउदे!
आमे भेल्याव बास, तॉ शार पास वाढपी एकदम टॅबलामॅरॅ जमा जालॅ, अॅकानॅ दइ कप ठोईला, अॅकानॅ फरसबी भाजी पानात वाडली, दुहऱ्यानॅ नाळा हिऱ्यामिंशी बटाट्याई भाजी ठोईली, मसुरी भाजी, पापड लॉंसा, मीठा.. आतॅ ई क्याबरबर खासा.. कुपाऱ्याव नेहमीसॉ प्रश्न? मॅ हात घायलॉ, जराक जराक भाज्यो साकॉन बगील्यो. दोन पापड तोडलॅ. आमशी ई माओर बगितॅ.. याला कऱ्यासा का? जकल्या ठिकानी हारकॉस.. मातॅ का करॅ? ईला का वाटातॅ ता वाटोंदे. आज, हम किसकी नही ऐकेंगे.
आली सपाती आली, पुऱ्यो आल्यो, मागो माग सांबार, रसम, ताक आला. अरे, अजून कय बाकी हाय गा? तव एक जन गॉडाअॅ परकार घॅवॉन पुडॅ ऊबॉ रॅलॉ. त्यामिनॅ गुलाब जामुन, गाजर हळवॉ, बासुंदी, खीर, श्रीखंड, रसगुल्ला ऑडॅ परकार हॉतॅ..
किती घ्याशॅ रे.? माअॅ डॉळॅ फिरलॅ. सिर्फ एक लेओ! आकाशवानी जाली. शॅ! मजा नाय ! आतॅ का घॅव.. इला हांगिला, तू श्रीखंड घॅ. मॅ रसगुल्लॉ घॅतॅ.. तिनॅ माकुन माओर बगीला आन.. याला का कऱ्यासा रे? कय कर नाका ! घॅ बास..
एक फुलका झाला, एक पुरी झाली.. हा हा करता करता पांस फुलकॅ आन शार पुऱ्यो पॉटात गेल्यो. पापडाऑ तॅ हिशेब नाय. कईस कळला नाय.. अजून येवोंदे.
अरे! धान जिवॅ गा नाय.. इनॅ मिनॅस कान साविलॉ.. तॅ वाढनारॅ थांबलॉतॅ.. मॅ इला हळूस बोयलॉ ता घॅऑ गनी. एक शेवटशी पूरी खातॅ.. मन भरला नाय अजून.. वाढप्याला डॉळॉ मारलॉ.. तुम देना बस, त्यानॅ का माईत, दोन पुरयो पानात टाकील्यो.. अरे अरे! एकच चाईये था.. अब असू दे! भाज्यो येतोत्यो आन खपात्योत्यो, कडे जात्योत्यो त्याव हिसाब नाय ! शेवटशो दोन पूरयो दडपिल्यो आन बगीला तॅ पान जकला साफ सुफ.. तॅआ
पानामिन्नॅ टेबल पन डॉक्याआ लागला. वाट बगीत भॅए तव अॅका मागोमाग परत आलॅ, जकलॅ परकार कय पानात टाक्या हांगील नाय, पन सांबार, मसुरी भाजी आनी धानाऑ ऑ डोंगर. तॉ वाडतॉतॉ आन मॅ बगितॉतॉ! बाजूला कुन तरी जाम सावकाश, अगदी फॉरेनेर कॉहॉ जिवतॅ तहा जिवतॉता.. माईस मंडळी.. होंदे.. तिला तहा जिव्या आवडातॅ अन् माला अहा. धानोर पैला दइ वाळला, मंग मसुरी भाजी.. कालविला, आन सुरु कॅला दडप्यादो.. मिने मिने सांबार पन वाळतोतॉ. खपला एकदासा.. थॉडा अजुन मागॉ गा का? नाका ! इ माऱ्या काडदे.. एक मस्त ढक्कर आलॉ. पावती मिळाली. माऑ ढक्कर आयकॉन नायक आन तॅय वाढपी पन हाया लागलॅ. माला वाटला तॅई, दोनदा हुश्श पन कॅला. माय पैशॅ वसूल.. गॉडॉ परकार मॅ कय खालॉ नाय.. जागास नोती.
हात धुईलॅ, कइस तॅल नाय हाताला, हात धॉयादो हाबुई पन गरज लागली नाय. पायरीओरनॅ उतऱ्यादो मात्र माय फॅरॅ फिरलॅ. सरळ टॅक्सीनॅ निगाले.
माटुंग्यातनॅ, दादर अहा करीत, विरार ट्रेन पकडली. इला हंगिला आपला स्टेशन आला गा उठव.. ई हाया लागली.. समाधानानॅ मावोर बगॉन ईनॅ मस्त स्माइल दिला.. ता शेवटसा खाल्ला, अन् तॉ जॉ मॅ निजलॉ तॉ वसय आला आन जाग आली..
अही नीज इंडियन रेल्वे शा ट्रेनमिनॅ येतॅ म्हंजॅ मॅ खरस सुखी हाय.. तॅआ रामा नायकशॅ मनातशा मनामिनॅ आबार मानलॅ.